बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! 'या' तारखेपासून बदलणार कामकाजासंबंधित नियम

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि सिंडिकेट बँकेचे (Syndicate Bank) खातेधारक असला तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक  (Canara Bank) आणि सिंडिकेट बँकेचे (Syndicate Bank) खातेधारक असला तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना चेकच्या माध्यमातून पेमेंट करण्यासंबंधित नियम बदलणार आहे. तर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक ग्राहकांसाठी आयएफसी कोड (IFSC Code) संबंधित नियमात बदल होणार आहे. तर जाणून घ्या कामकाजासंबंधित नेमके कोणते नियम बँकेकडून बदल करण्यात आले आहेत.(Covid Vaccination FAQs बाबत माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्क नंबर +91 - 9013151515)

बँक ऑफ बडोदा ग्राहकांसाठी 1 जून 2021 पासून Positive Pay Conformation अनिवार्य केले जाणार आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्यापासून बचाव होणार आहे. तर पॉझिटिव्ह पे सिस्टिम एक प्रकारे फसवणूकीला आळा घालणारे एक टूल आहे. या सिस्टिम अंतर्गत एखाद्याने चेक टाकल्यानंतर त्याला आपल्या बँकेची संपूर्ण डिटेल्स द्यावे लागणार आहेत. चेक पेमेंट मधून यापूर्वी माहिती बँक क्रॉस-चेक करणार आहे. जर यामध्ये काही गडबड असल्यास तर बँककेडून चेक रिजेक्ट केला जातो.

BoB यांचे असे म्हणणे आहे की, ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टिम अंतर्गत चेक डिटेल्स अशावेळी रिकन्फर्म होईल ज्यावेळी 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम बँकेचा चेक असेल. हा नियम येत्या 1 जून 2021 पासून लागू होणार आहे.(ITR 2021 Filing Deadline: करदात्यांना दिलासा; सरकारने वाढवली 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख, जाणून घ्या नवीन डेडलाईन)

तसेच कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै पासून IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा आयएफएससी कोड येत्या 30 जून पर्यंत अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. नव्या आयएफएससी कोड बद्दलच्या अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तर कॅनेरा बँक मध्ये सिंडिकेट बँकेचे विलिकरण करण्यात आले होते. तर बँक ऑफ बडोदा मध्ये विजया आणि देना बँकचे विलय करण्यात आले होते.