जागतिक स्तरावरील 'ही' सॉफ्टवेअर फर्म FY23 साठी भारतात देणार 9000 जणांना Work From Anywhere सह नोकरीची संधी

देशात Tier II आणि III शहरांमधील तरूणांना नोकर्‍या देण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Work | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोविड 19 च्या संकटामधून जग सावरत असताना आता नोकरीच्या ठिकाणी अनेक बदल झाले आहेत. अनेज कंपन्यांनी आता सोय पाहून त्यांच्या विशिष्ट कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम ची सोय कायम ठेवली आहे. दरम्यान भारतात आता [24]7.ai या जागतिक पातळीवरील सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस कंपनीने 9 हजार जणांच्या भरतीची घोषणा केली आहे. देशात Tier II आणि III शहरांमधील तरूणांना नोकर्‍या देण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 'Work From Anywhere' चा पर्याय दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2023 साठी ही नवी नोकरभरती [24]7.ai कडून केली जाणार आहे. [24]7.ai च्या एच आर डी हेड ने 'मिंट' ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'भारतामध्ये चांगल्या टॅलेंटचा हब आहे. होतकरू कामगारांमध्ये गुंतवणूक करून त्यांची फ्रेशर्स ते लीडर अशी जडणघडण करण्याकडे आमचा कल असतो. यामुळे आमचा attrition rate कमी आहे. हे देखील नक्की वाचा:  Work from Home Rule: घरून काम करण्याबद्दल सरकारचा नवा नियम; आता कर्मचारी एक वर्ष करू शकणार वर्क फ्रॉम होम .

मागील वर्षी देखील भारतामध्ये 5000 जणांना नोकरी देण्यात आली होती. [24]7.ai कंपनीला नुकताच लास वेगास मध्ये CCW Excellence Awards मध्ये "BPO of the Year" हा पुरस्कार देण्यात आला आहे. जगातील आघाडीच्या कस्टमर इव्हेंट मध्ये हा पुरस्कार Customer Contact Week कडून देण्यात आला.  [24]7.ai कडून आर्टिफिशिअल इंटेलिजंसचा वापर करून  व्यवसाय आणि ग्राहकांची सांगड घालत सेवा देऊन व्यवहार केला जातो.