1 जानेवारी 2020 मध्ये होणार मोठे बदल, महागणार 'या' वस्तू
नव्या वर्षात तुम्ही जर काही गोष्टींबाबत काही खास प्लॅनिंग केली असलेच. पण मात्र नव्या वर्षात तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण 1 जानेवारी 2020 मध्ये काही गोष्टींबाबात मोठे बदल होणार आहेत
नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नव्या वर्षात तुम्ही जर काही गोष्टींबाबत काही खास प्लॅनिंग केली असलेच. पण मात्र नव्या वर्षात तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण 1 जानेवारी 2020 मध्ये काही गोष्टींबाबात मोठे बदल होणार आहेत. त्याचसोबत वस्तूंच्या किंमती सुद्धा वाढणार आहे. इलेक्ट्रिक प्रोडक्ट्स पासून ते ऑटो सेक्टर पर्यंतच्या क्षेत्रात येणाऱ्या वस्तूं महागणार आहेत. त्यामुळे नव वर्षापूर्वीच काही महत्वाचे कामे किंवा खरेदी करायची असल्यास करु घ्या.
Consumer Product Industry यांच्या मते जागतिक स्तरावर TV यांच्या किंमतीत 15-17 टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच टेलिव्हिजनच्या किंमतीत जबरदस्त वाढ होणार असून त्याचा थेट परिणाम ग्राहकाच्या शिखावर होणार आहे. तसेच उर्जा लेवलिंग मानदंड सुद्धा जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे फाइव्ह स्टार रेफ्रिजरेटरच्या उत्पादनात 6 हजार रुपयांना महागणार आहे.
तसेच खाद्यपदार्थांच्या बाबत बोलायचे झाल्यास तेल, लसूण, तिळ यासारख्या अन्य वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. एफएमजीसी कंपन्या नेस्ले आणि आयटीसी, पार्ले त्यांच्या प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ करण्याऐवजी पॅकेटचा आकार कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वस्तू सुद्धा महागणार आहेत. जानेवारी महिन्यात स्नॅक, मीठ, फ्रोजेन फूड, केक, साबण, रेडी टू ईट मिल्स, बिस्किट आणि न्यूडल्स सारख्या वस्तू महागण्यची शक्यता आहे.(31 डिसेंबर आधी करा ही '4' महत्त्वाची कामे अन्यथा भरावा लागेल मोठा भुर्दंड)
ऑटो सेक्टर मध्ये येणाऱ्या काही कंपन्या त्यांच्या कार मॉडलच्या किंमती वाढवणार आहेत. ह्युंडाई आणि रेनॉल्ट कंपनीच्या कार महागार असल्याने तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर तुम्ही हे लक्षात ठेवा. ह्युंडाई कंपनीच्या कारमध्ये हॅचबॅक, सेडान, SUV यांच्या किंमतीत वाढ करणार आहे.
1 जानेवारी 2020 मध्ये होणार मोठे बदल, महागणार 'या' वस्तू Watch Video
नुकत्याच देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी एक नोटिस जारी केली आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले डेबिट कार्ड बंद होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले डेबिट कार्ड असल्यास ते आजच बदलून घ्या. कारण 2020 मध्ये फक्त EVM चीप आणि पिन कार्ड वापरण्यात येणार आहेत. तर आरबीआयने आदेश देत डेबिट कार्डमधील बदल अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.