Coronavirus: कोरोना विषाणू संकटाशी लढण्यासाठी भारतातील ‘ही’ चार शहरे ठरली रोल मॉडेल; रुग्णांची संख्या व मृत्युदर आणले नियंत्रणात
देशात अशी अनेक शहरे आहेत जिथे एकेकाळी या विषाणूने हाहाकार माजवला होता, मात्र अथक परिश्रम, उपाययोजना, नागरिकांनी प्रशासनाला केलेले सहकार्य यांच्या जोरावर ही शहरे कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यात यशस्वी ठरली आहेत.
भारतामध्ये मार्चपासून कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रकरणांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली होती. देशात अशी अनेक शहरे आहेत जिथे एकेकाळी या विषाणूने हाहाकार माजवला होता, मात्र अथक परिश्रम, उपाययोजना, नागरिकांनी प्रशासनाला केलेले सहकार्य यांच्या जोरावर ही शहरे कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यात यशस्वी ठरली आहेत. जयपूर (Jaipur), इंदूर (Indore), चेन्नई (Chennai) आणि बेंगलुरु (Bengaluru) या चार शहरांनी कोरोना विषाणूचे नियंत्रण आटोक्यात आणले आहे. देशातील इतर शहरांना त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, कोरोना परिस्थिती उत्तमरीत्या हाताळण्यासाठी व कोरोना विषाणूच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, केंद्र सरकारने या शहरांना ‘रोल मॉडेल’ (Role Models) ठरवले आहे.
कोविड-19 च्या व्यवस्थापनाविषयीचे अनुभव कथन करण्यासाठी, गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने विविध महानगरपालिकांमध्ये बैठक घेतली. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांचा सामना कसा करावा आणि मृत्यू दर कमी कसे करावा या दोन गोष्टींवर चर्चा झाली. जयपूर आणि इंदूर या महानगरांनी कोरोना विषाणूची परिस्थितीत चांगल्या प्रकारे हाताळली आहे, तर चेन्नई व बेंगळुरू या दोन मोठ्या शहरांनी मृत्यूदर कमी केला आहे.
जास्त लोकसंख्या असलेल्या, मोठ्या शहरांमध्ये, झोपडपट्ट्या असलेल्या भागांमध्ये या विषाणूचा धोका अधिक असतो. देशातील बर्याच नगरपालिकांसमोर डबलिंग रेट, रुग्ण वाढीचा दर आणि मृत्यू दर कमी करण्याचे आव्हान आहे. इंदूर आणि जयपूरमध्ये घरोघरी सर्वेक्षण आणि संपर्क ट्रेसिंग केले जात आहे. याशिवाय इंदूरने रस्त्यावर गस्त घालण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. जयपूर मध्ये संभाव्य सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी, किराणा आणि भाजीपाला विक्रेत्यांची संख्या कमी केली आहे. या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता चालू आहे व लोकांना नियमांचे पालन करण्यास उद्युक्त केले जात आहे.
चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त आहे, परंतु दोन्ही शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात यश आले आहे. दोन्ही महानगरांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 1% आहे, जे राष्ट्रीय सरासरी 3% पेक्षा कमी आहे. अशाप्रकारे दोन्ही कोरोना रूग्णांच्या उपचारासंदर्भात, दक्षिणेच्या या दोन्ही शहरांनी परिणामी राज्यांनी एक उदाहरण घालून दिले आहे. चेन्नई आणि बेंगळुरू शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णांना हाताळताना, व्हेंटिलेटरचा चांगला वापर केला आहे आणि उपचाराच्या गरजेच्या आधारे रूग्णांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.