Gold Price In 2023: आनंदाची बातमी! नव्या वर्षात सोन्याचे भाव वधरणार, जाणून घ्या नव्या किमती

तरी येत्या वर्षातील म्हणजेचं २०२३ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold | Photo Credits: Pixabay.com)

२०२२ या वर्षभरात बहुदा सोन्याची किंमत पन्नाशी पारचं बघायला मिळाली. गेल्या वर्षभरात उन्हाळा आणि दिवाळीत मोठ्या संख्येने देशभरात लग्न सोहळे पार पडलेत. दरम्यान सोन्याची मोठी खरेदी झाली. तसेच दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया यासारख्या मोठ्या सणांना देखील गुंतवणुक म्हणुन मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्या गेल. पण २०२२ च्या तुलनेत २०२३ या वर्षात सोन्याचे भाव वधरणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे २०२३ या आर्थिक वर्षात सोन्याची किंमत कमी होणार असुन काही कार्यप्रसंगासाठी किंवा गुंतवणुक म्हणुन तुम्ही सोनं खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. किंबहुना केंद्र सरकारकडूनचं यासंबंधीत महत्वपूर्ण घोषणा केली जाणार आहे. कॉमर्स मिनिस्ट्रीने 2023 च्या बजेटमध्ये सोन्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. तरी येत्या वर्षातील म्हणजेचं २०२३ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

केंद्र सरकारने जुलै महिन्यात सोन्यावरील आयात शुल्क 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के केले होते. चालू खात्यावरील तूट कमी व्हावी आणि सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा बसावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले होते. पण आता हा कर पुन्हा कमी केला जाणार असल्याची चर्चा आहे. असे केल्यास सोन्याच्या किंमती आता असलेल्या किमतीच्या तुलनेत ५ ते ६ टक्क्याने घट होण्याची शक्यता आहे. म्हणजेचं सोन घरेदीचं नियोजन करणाऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. (हे ही वाचा:- Small Saving Schemes Rate Hike: खुशखबर! सरकारने किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत, NSC आणि पोस्ट ऑफिस ठेव योजनांवर वाढवले व्याजदर)

 

तसेच सोन्या बरोबर चांदी, हिरे अशा विविध दागिन्यांच्या किमतीत ही घसरण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सोन्यावरील आयात शुल्क कमी झाल्यास २०२२ मध्ये  २०२३ च्या तुलनेत सोन स्वस्त होणार आहे. तरी सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी असचं काहीस म्हणण्याची वेळ आली आहे. तरी येत्या २०२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पाची आता सर्वांना प्रतिक्षा लागली आहे.