Shocking! नवजात अर्भकाचे डोके तोंडात घेऊन जात होता कुत्रा; दृश्य पाहून Hyderabad मधील स्थानिकांना धक्का
बाळाचे धड अद्याप सापडलेले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर स्थानिकांना धक्काच बसला
हैदराबादच्या (Hyderabad) वनस्थलीपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील सहारा गेटजवळ एक कुत्रा नवजात बाळाचे डोके (Head of Newborn) तोंडात घेऊन जाताना दिसला. कुत्र्याच्या तोंडात नवजात बालकाचे डोके पाहून स्थानिक लोकांना धक्काच बसला. घटनास्थळाजवळ दूध बूथ चालवणाऱ्या व्यक्तीने वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती व तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकासह तपास केला, आता अखेर रस्त्यावरील कुत्र्याला नवजात अर्भकाचे डोके कोठून मिळाले? त्या मुलाला अशा प्रकारे कोणी, कुठे आणि का सोडले, याचा तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मनचना कार्तिक यांचा मुलगा मनचना महेंद्र (वय 27 याची तक्रार आली होती. त्याने सांगितले की, 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तक्रारदार हा सहारा रोड येथील विवेकानंदांच्या मूर्तीजवळील त्याच्या मित्राच्या दुधाच्या दुकानात बसला होता. त्यावेळी त्याला एक कुत्रा त्याच्या तोंडात नवजात बाळाचे डोके धरून बसलेला दिसला. हे पाहून तक्रारदार कुत्र्याजवळ गेला, त्यावेळी कुत्रा मुलाचे डोके तेथेच सोडून पळून गेला. त्यानंतर तक्रारदाराने लगेच डायल 100 वर कॉल केला, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: प्रेयसीच्या पतीला दारु पाजून वर्धा नदीत फेकले; आरोपीने भासवला अपघात, तरीही पोलीसांनी गूढ उकललंच)
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता हे डोके दोन-तीन दिवसांच्या मुलाचे असल्याचे आढळून आले. बाळाचे धड अद्याप सापडलेले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर स्थानिकांना धक्काच बसला. अनेक लोकांनी याचा संबध नरबळीशी लावला. तर काही जणांनी हे अपहरण असल्याचे सांगितले. कदाचित मुलाच्या मृत्युनंतर पालकांनी मृतदेहाचे नीट दफन केले नसावे, असे दिसते. रस्त्यावरील कुत्र्यांनी ती जागा खणून डोके धडापासून वेगळे केले असावे. मात्र, हा केवळ आमचा अंदाज आहे. खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तपास केला जात आहे. पोलिसांनी अद्याप कोणतेही कारण सांगितलेले नाही.