केंद्र सरकार खरेदी करणार Zydus Cadila Vaccine लसीचे 1 कोटी डोस, किंमत प्रती मात्रा 265 रुपये
केंद्राने या लसीची ऑर्डरही दिली आहे. या लसीची किंमत प्रति डोस 265 रुपये इतकी असेल. केंद्र सरकारने म्हटले आहे की, Zydus Cadila आपल्या कोविड-19 लसीच्या सुमारे 1 कोटी मात्रा प्रति मात्रा 265 रुपये दराने देण्याचे मान्य केले आहे.
सुईविरहीत Zydus Cadila लसीचे एक कोटी डोस केंद्र सरकार खरेदी करत आहे. केंद्राने या लसीची ऑर्डरही दिली आहे. या लसीची किंमत प्रति डोस 265 रुपये इतकी असेल. केंद्र सरकारने म्हटले आहे की, Zydus Cadila आपल्या कोविड-19 लसीच्या सुमारे 1 कोटी मात्रा प्रति मात्रा 265 रुपये दराने देण्याचे मान्य केले आहे. मात्र, अद्यापही हा व्यवहार होणे बाकी आहे. Zydus Cadila चे ZyCov-D ही पहिली लस आहे. जी भारताच्या ड्रग नियामक 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना देण्यास मान्यता दिली आहे.
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यामांनी म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात विकसीत देशांच्याही आगोदर डीएनए-आधारीत कोविड-19 लसीच्या मात्रेस लसीकरण मोहिमेत सहभागी करण्याबाबत हिरवा झेंडा दाखवला आहे. सुरुवातीस वृद्धांच्या लसीकरणास प्राधान्य दिले जाईल. सूत्रांनी म्हटले आहे की, अहमदाबाद येथील फार्मा कंपनीने पहिल्यादा आपल्या तीन डोसची किंमत 1900 रुपये इतकी सांगितली होती. सीमित उत्पादन क्षमतेमुळे सुरुवातीला वृद्धांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, UK: ब्रिटेनकडून सर्व देशांना प्रवासाच्या Red List मधून काढले बाहेर, नागरिकांना 10 दिवसांच्या क्वारंटाइन पासून मिळणार दिलासा)
कंपनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जाईडस कॅडीला प्रति महिना जाईकोव-डीची एक कोटी डोस देण्याच्या स्थितीत आहे. यात तीन डोस 28 दिवसांच्या अंतरांनी द्यायचे आहेत. देशात विकसीत झालेली ही जगातील पहिली लस आहे. जी एएनए-आधारीत म्हणजेच सूई-विरहीत आहे. जाइकोव-डी ला 20 ऑगस्टपासून औषध नियामकने आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.