Thai Girl Assaulted inside SMIMER Hostel: सूरतच्या मेडिकल कॉलेज मध्ये बॉईज हॉस्टेल मध्ये 'थाई मुली'चा हंगामा; पोलिस तपास सुरू
या प्रकरणी तपासानंतर आरोपी विरूद्ध कडक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
सूरत महानगर पालिका द्वारा चालवण्यात येणार्या स्मीमेर हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल कॉलेज ( Surat Municipal Institute of Medical Education and Research) चं नाव पुन्हा चर्चेमध्ये आलं आहे. शनिवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये रेसिडंट डॉक्टर द्वारा रात्री थाई मुलगी बोलावण्यात आल्याच्या प्रकारावरून गोंधळ झाला आहे. कॉलेज प्रशासनाकडून हॉस्टेल जवळ बिअर बॉटेल आणि दारूच्या काही बाटल्या सापडल्या. दरम्यान थाई मुलगी आणि आरोपी डॉक्टर मध्ये एक भांडण झालं आणि त्यानंतर मुलीने हॉस्टेलच्य परिसरामध्ये हंगामा करण्यास सुरूवात केली. या मुलीने प्रशासनाने मोठ्या मुश्किलीने बाहेर काढले. दरम्यान आता या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सूरत मनपा कडून चालवण्यात येणार्या स्मीमेर हॉस्पिटलच्या आजुबाजूच्या भागातच हे मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेल आहे. शनिवारी रात्री बोलावण्यात आलेल्या थाई मुलीकडून रेजिडेंट डॉक्टरला तिने कानशिलात वाजवली होती. त्यानंतर तिने हंगामा करण्यास सुरूवात केली. ती सिक्युरिटी केबिन मध्येही गेली पण ती बोलत असलेली इंग्रजी समजत नसल्याचं त्याने सांगितलं आहे.
मेडिकल कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. राजेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची कडक तपासणी केली जाईल. थाई मुलीबद्दलही तपास केला जात आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेज देखील तपासून पाहत असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान आरोपी डॉक्टर हा आर्थोपेडिक च्या शेवटच्या वर्षामध्ये आहे. हॉस्टेल मध्ये बाहेरून मुली बोलावण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. मुलांच्या हॉस्टेलमध्ये पार्ट्यांचं सत्र सुरू असतं. BS Yediyurappa booked under POCSO: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्याविरूद्ध 17 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल .
मेडिकल कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ राजेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळोवेळी रूमची तपासणी केली जाते पण बॉटल्स कधी मिळालेल्या नाहीत. या प्रकरणी तपासानंतर आरोपी विरूद्ध कडक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.