NIA चे तीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; हाफिस सईद याच्याशी संबंधीत प्रकरणात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
तसेच, तत्काळ त्याची चौकशीही सुरु केली. प्राथमिक कारवाई म्हणून या तिन्ही अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यानंतर डीआयजी श्रेणीतील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. चौकशी पूर्ण होताच या तिन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
टेरर फंडीग (Terror Funding) प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) अर्थातच एनआयए (NIA) चे तीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. टेरर फंडींग प्रकरणात अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, काहींची चौकशी सुरु आहे. दरम्यान, आता एनआयए अधिकाऱ्यांचेच नाव या प्रकरणात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात एसपी श्रेणीतील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. एनआयएच्या या तिन्ही अधिकाऱ्यांवर आरोप आहे की, दहशतवाद्यांना मदत केल्या प्रकरणात नाव पुढे येऊ नये यासाठी या अधिकाऱ्यांनी दिल्ली येथील एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितली. या प्रकरणात नाव येऊ नये यासाठी हे अधिकारी त्या व्यापाऱ्याला सातत्याने ब्लॅकमेल करत असत.
इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, साधारण एक महिन्यापूर्वी एनआयएला एसपी आणि तीन इतर ज्यूनिअर अधिकाऱ्यांविरोधात एक तक्रार मिळाली होती. हे तीन अधिकारी पाकिस्तानच्या पाठिंब्यावर आधारलेली संघटना लश्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या कुख्यात दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिस सईद (Hafiz Saeed) याच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या Falah-i-Insaniyat Foundation (FIF) नामक एका फाउंडेशनची चौकशी करत होते.
एनआयएला या 3 अधिकाऱ्यांविरोधात तक्रार मिळाल्यानंतर एनआयएने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. तसेच, तत्काळ त्याची चौकशीही सुरु केली. प्राथमिक कारवाई म्हणून या तिन्ही अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यानंतर डीआयजी श्रेणीतील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. चौकशी पूर्ण होताच या तिन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. (हेही वाचा, भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसल्याचा संशय, देशभरात हाय अलर्ट जाहीर)
दरम्यान, टेरर फंडिंग प्रकरणात खंडणी उकळल्याचा आरोप ज्या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे तो अधिकारी 2007 मध्ये झालेल्या समझौता बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य अधिकारी राहिले आहेत. या प्रकरणात चौकशी पथकाने एका व्यक्तीची प्राथमिक चौकशीही केली आहे. सांगितले जात आहे की, हा व्यक्तीही या अधिकाऱ्यांसोबत खंडणी प्रकरणात सहभागी होता.