Representative Image

तेलंगणातील (Telangana) बंदलागुडा (Bandlaguda) येथील पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर नवविवाहितेला जादूटोण्याने बरे करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी एका दुकानामध्ये युनानी मेडिसीन विकायचा. त्याला कलम 376(1) आणि 354-B अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.

जून मध्ये विवाहबद्ध झालेली ही महिला जेव्हा आईला भेटायला आली होती तेव्हा तिने काही शारिरीक त्रास होत असल्याचे आईला सांगितलं. मग तिच्या आईनेच तिला 'मुर्शाद' कडे नेले. अध्यात्मिक उपचारपद्धतीचा मात्र तिच्यावर परिणाम होत नव्हता.

जेव्हा ती आपल्या पतीच्या घरी परत आली तेव्हा तिने आपल्या जोडीदाराला आणि त्याच्या आईला तिच्या स्थितीबद्दल सांगितले. सासरच्या लोकांनी तिला गुन्हेगार, मित्राकडे नेले. पीडितेच्या घरी भेट दिल्यानंतर, आरोपीने दावा केला की तिच्यावर पाच राक्षसी शक्तींचा हानिकारक प्रभाव पडत आहे आणि तिला उपचाराची गरज आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने तिला फाटलेले कपडे घालून बांदलागुडा येथील त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा महिला आणि तिचा पती त्याच्या घरी आले तेव्हा आरोपीने पुरुषाला बाहेर थांबायला सांगितले. "आरोपींनी थेरपीच्या नावाखाली पीडितेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि कपडे उतरवले. ACP (Chandrayangutta) K Manoj Kumar यांच्या माहितीनुसार, त्याने तिचे चुंबन घेतले आणि स्पर्श केला. त्यानंतर महिलेच्या बहिणीने तिला पोलिसांकडे आणले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.