Telangana Video: पूराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाचे तेलंगणा पोलिसांनी वाचवले प्राण (पाहा व्हिडिओ)
दुचाकीवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पुराच्या पाण्यात वाहून जाताना तेलंगणा (Telangana) पोलिसांनी वाचवले. ही घटना तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी (Telangana Police) जिल्ह्यात घडली. कालीझ खान दर्ग्याकडून (Kaliz Khan Dargah) शमशाबादच्या (Shamshabad ) दिनशेने जाताना दुचाकीस्वार पूलावरुन पुराचे पाणी वाहत असतानाही पूल पार करत होता.
दुचाकीवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पुराच्या पाण्यात वाहून जाताना तेलंगणा (Telangana) पोलिसांनी वाचवले. ही घटना तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी (Telangana Police) जिल्ह्यात घडली. कालीझ खान दर्ग्याकडून (Kaliz Khan Dargah) शमशाबादच्या (Shamshabad ) दिनशेने जाताना दुचाकीस्वार पूलावरुन पुराचे पाणी वाहत असतानाही पूल पार करत होता. दरम्यान, तो वाहून जाऊ लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी उपस्थिती लावत तरुणाचे प्राण वाचवले.
सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर वाहतूक पोलिस स्टेशनचे एचसी बेग यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने संध्याकाळी 4.45 च्या सुमारास या तरुणाची सुटका केली.
हा तरुण हिमायत सागर सर्व्हिस रोड ब्रिज ओलांडून कालीज खान दर्गा ते शमशाबादकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. दोन्ही बाजूंनी पुरेसे कर्मचारी आणि वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पण तरीही सर्वांची नजर चुकवून तो पाण्यात घुसला. पूलाच्या मध्यभागी येताच तो वाहून जाऊ लागला. पोलिसांनी वेळीच मदत आणि बचाव कार्य केल्याने त्याचे प्राण वाचले. (हेही वाचा, Uttar Pradesh Accident: चालकाचा बसवरील ताबा सुटला; प्रवाशांनी भरलेली भरधाव गाडी पेट्रोल पंपावर आदळली (See Shocking Video))
ट्विट
देशभरात अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाोली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी महापूह आणि पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेकडो एकर शेतजमीनिवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तर काही ठिकाणी गावांना पूराचा वेढा पडल्याने संपर्क तुटला आहे. राज्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात नसल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच निर्णय घेत आहेत. मंत्रिमंडळ नसल्याचा फटका नागरिकांना होणाऱ्या मदत आणि बचाव कार्यावर होतो आहे. तरीही प्रशासन शक्य त्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य राबवत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जीवित तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)