IPL Auction 2025 Live

Telangana Crime: भटक्या कुत्र्यांवर गोळीबार, 20 ठार, 5 जखमी; तेलंगणा राज्यातील घटना

धक्कादायक म्हणजे या कुत्र्यांवर गोळीबार (Street Dogs Gunned Down) झाल्याची माहिती पुढे येत आहे. गोळीबार झालेल्या एकूण कुत्र्यांपैकी पाच कुत्रे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Street Dogs | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

तेलंगणा राज्यातील (Telangana Crime) महबूबनगर जिल्ह्यातील (Mahbubnagar District) पोन्नाकल (Ponnakal Village) गावात 20 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या कुत्र्यांवर गोळीबार (Street Dogs Gunned Down) झाल्याची माहिती पुढे येत आहे. गोळीबार झालेल्या एकूण कुत्र्यांपैकी पाच कुत्रे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, अज्ञाताविरोधात प्राणी क्रूरता कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, गावकऱ्यांना शुक्रवारी सकाळी कृत्र्यांचे मृतदेह विखुरलेल्या आवस्थेत आढळून आले. गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची तत्काळ माहिती देण्यात आली.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

पोलिसांनी कत्र्यांच्या मृत्यबाबत संशय आल्यानंतर पशुवैद्यकीय विभागाला पचारण केले. पशुवैद्यकीय विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती पुढे आली. कुत्र्यांना छर्रे मारुन त्यांची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांना संशय होता. मात्र, कुत्र्यांची हत्या छर्रे मारुन नव्हे तर चक्क गोळ्या घालून केल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालात पुढे आली. स्थानिकांच्या हवाल्याने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे दीड ते अडीच वाजणेच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी सांगितले की, अनोळखी व्यक्तीने त्यांच्या डोळ्यासमोर कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या. ज्यामुळे कुत्रे तडफडून मेले. (हेही वाचा, New Mumbai Shocker: कोपरखैरणे येथे मद्यधुंद व्यक्तीचा कुत्र्यावर बलात्कार; घटना कॅमेऱ्यात कैद (Video))

प्राणीमित्रांकडून संताप आणि निषेध व्यक्त

भूतपूरचे पोलिस निरीक्षक एम. रामकृष्ण यांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने आरोपींना कारमध्ये येताना आणि कुत्र्यांना जवळून गोळ्या घालताना पाहिले. तसेच, या घटनेत इतरही पाच भटके कुत्रे गंभीर जखमी झाले आहेत. पशुवैद्यकीय विभाग त्यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, कुत्र्यांची हत्या आणि हिंसाचारामुळे स्थानिक रहिवासी आणि प्राणीमित्रांकडून संताप आणि निषेध व्यक्त करण्यातयेत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसेच, स्थानिक नागरिकांकडूनही आरोपींबापत माहिती घेतली जात आहे. पोलीस लवकरच आरोपींपर्यंत पोहोचतील, असा विश्वासही रामकृष्ण यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Animal Sexual Abuse: 'तब्बल 40 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार, सेक्स दरम्यान अनेक प्राण्यांचा मृत्यू'; Adam Britton ची कोर्टात भयानक गुन्ह्यांची कबुली)

दरम्यान, भटक्या कुत्र्यांसोबत अमानुश वर्तन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुणे येथील सांघवी परिसरात अज्ञातांनी भटक्या कुत्र्याच्या डोळ्यात लोखंडी सळ्या घुसवल्या होत्या. ज्यामुळे अंध झाल्याने आणि प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पीडित कुत्र्याचा मृत्यू झाला होता. आणखी एका घटनेत एका विकृताने कुत्र्याच्या पाटीला गॅसचे फुगे बांधून त्याला हवेत सोडले होते. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची एकच लाट उसळली होती. अशा घटनांमध्ये पोलीस अनेकदा कारवाई करतात. आरोपींना अटकही होते. परंतू काही दिवसांनंतर पुन्हा अशाच घटना घडताना दिसतात. वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या एका पाळीव कुत्र्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पुढ आली होती. या घटनेनंतर आरपीला अटकही झाल होती.