IPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु

भारतात आयपीएलची लोकप्रियता लक्षात घेऊन काही डायरेक्ट टू होम (DTH) सर्विस धारकांनी त्यांच्या युजर्ससाठी फ्रीमध्ये आयपीएलचे सर्व सामने पाहता येण्यासाठी खास सेवा सुरु केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

इंडियन प्रिमियम लीगची (IPL) रंगत सुरु झाली आहे. भारतासह जगभरात क्रिकेटप्रेमी आयपीएलची वाट पाहत असतात. त्यामुळे भारतात आयपीएलची लोकप्रियता लक्षात घेऊन काही डायरेक्ट टू होम (DTH) सर्विस धारकांनी त्यांच्या युजर्ससाठी फ्रीमध्ये आयपीएलचे सर्व सामने पाहता येण्यासाठी खास सेवा सुरु केली आहे. टेलीकॉम टॉकच्या रिपोर्ट्सनुसार भारतात टाटा स्काय (Tata Sky) आणि एअरेट डिजिटल टीव्ही (Airtel Digital TV) यांनी क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे सामने फुकटात पाहण्याची संधी दिली आहे.

टाटा स्कायने यापूर्वी आयपीएलचे सामने युजर्सला फ्री मध्ये पाहता येणार असल्याचे सांगितले होचे. तसेच 23 मार्च पासून Star Sports 1 हिंदी, Star Sports 1 तमिळ, Star Sports 1 तेलगू, Star Sports 1 कन्नड आणि Star Sports 1 बंगाली या चॅनसाठी फ्री युजर्संना सब्सक्रिप्शन देण्यात आले आहे. टाटा स्कार त्यांच्या युजर्सला आयपीएलचे सामने पाहण्यासाठी चॅमलसाठी कोणताही अतिरिक्त शुल्क 19 मे 2019 पर्यंत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत Family Sports HD पॅक टाटा स्कायने लॉन्च केला आहे. या पॅकची किंमत 646 रुपये आहे.(हेही वाचा-मुंबई: किफायतशीर दरात टीव्ही पाहता यावा याकरिता मुंबईकरांची ‘केबल १९९ ओन्ली’ मोहीम)

Star Sports कडे आयपीएल प्रसारण करण्याचे हक्क आहेत. तर एअरटेल डिजिटल टीव्ही यांनीसुद्धा नवीन आणि जुन्या युजर्ससाठी आयपीएलचे सामने फ्रीमध्ये पाहण्याची सेवा सुरु केली आहे. यामध्ये Star Sports 1 आणि Star Sports 1 हिंदी चॅनलसाठी फ्री सब्सक्रिप्शन देणार असल्याचे म्हटले आहे.