Tata Doubles Down on iPhones: होसूर कारखान्यात आयफोनचे उत्पादन दुप्पट करण्याची टाटाची योजना; मिळणार 28 हजार लोकांना नोकऱ्या

पुढील 1 ते 1.5 वर्षात कंपनी 25 ते 28 हजार लोकांना कामावर ठेवेल. अहवालानुसार, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, 'कंपनी सध्याच्या आकाराच्या आणि क्षमतेच्या 1.5-2 पटीने युनिटचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.

Apple (Apple / Twitter)

देशातील आघाडीची टेक कंपनी टाटा ग्रुप (TATA Group) नेहमीच काहीतरी मोठे करण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच टाटाने आपला मेगा प्लान उघड केला आहे, ज्या अंतर्गत आता देशातील मोठ्या लोकसंख्येच्या हातात आयफोन असण्याची शक्यता आहे. भारतीय कंपनी टाटा आता देशातच आयफोन बनवणार आहे हे तर आपणास माहीतच आहे. मात्र आता कंपनीला भारतात आयफोन निर्मितीचा वेग दुप्पट करायचा आहे. यासाठी टाटा देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतात अॅपल आयफोनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करणार आहे.

आपल्या कामाचा झपाट्याने विस्तार करण्यासाठी, टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी $ 125 दशलक्ष मध्ये खरेदी केली आहे. टाटा आता या कंपनीच्या विस्तार योजनेअंतर्गत त्यांच्या होसूर आयफोन युनिटमध्ये सुमारे 28000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. कंपनी आता या युनिटचा विस्तार करत आहे. या विस्तार योजनेअंतर्गत त्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

या युनिटमध्ये एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पुढील 1 ते 1.5 वर्षात कंपनी 25 ते 28 हजार लोकांना कामावर ठेवेल. अहवालानुसार, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, 'कंपनी सध्याच्या आकाराच्या आणि क्षमतेच्या 1.5-2 पटीने युनिटचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. (हेही वाचा: Amazon to Use Waterways for Delivery: आता अॅमेझॉन अंतर्देशीय जलमार्गाने करणार पॅकेजेसची डिलिव्हरी; IWAI सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)

विस्ट्रॉन 2008 मध्ये भारतात आली, या कंपनीने 2017 मध्ये Apple साठी आयफोन तयार करण्यास सुरुवात केली. या प्लांटमध्येच आयफोन 14 मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. येथे 10,000 हून अधिक कामगार काम करतात, टाटा कंपनीने हा प्लांट खरेदी करून कौतुकास्पद काम केले आहे. आता टाटांनी ही कंपनी विकत घेतल्यानंतर विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडली आहे. विस्ट्रॉन कंपनीशिवाय Pegatron आणि Foxconn देखील भारतात आयफोन तयार करतात. आता भारतीय कंपनी टाटानेही या यादीत प्रवेश केला आहे.