Tamil Nadu Shocker: शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक; तामळनाडू राज्यातील सालेम येथील घटना
तामिळनाडूतील सालेम येथे सरकारी शाळेतील इयत्ता अकरावीचे तीन विद्यार्थ्यांना एका कनिष्ठ विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामिळनाडू (Tamil Nadu Crime) राज्यातील सालेम (Salem Sexual ) जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेत, सरकारी शाळेतील अकरावीच्या तीन विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये एका कनिष्ठ विद्यार्थ्यी असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यान्वये (POCSO Case) अटक करण्यात आली आहे. ही घटना 22 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. घडल्यानंतर या प्रकरणाची कोणालाच माहिती नव्हती, मात्र, एका विद्यार्थ्याने 5 फेब्रुवारी रोजी एका वर्गमित्राने एका शिक्षकाला माहिती दिली तेव्हा, हे प्रकरण उघडकीस आले. या शिक्षकाने नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळूनही शाळा प्रशासनाने कारवाई करण्यास कथितरित्या विलंब केल्याचे आरोप होत आहे. विद्यमान स्थितीत हे प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचले आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.
हेल्पलायीन क्रमांकावरुन मदत
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडितेच्या काकांनी 10 फेब्रुवारी रोजी 24 तास सुरु असलेल्या बाल हेल्पलाइन 1098 वर फोन केला. ज्यामुळे बाल कल्याण अधिकाऱ्यांकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या चौकशीनंतर, सालेम पोलिसांना सतर्क करण्यात आले, ज्यामुळे आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाई
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, तीन आरोपी अल्पवयीन मुलांवर लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. घटनेची तक्रार करण्यास उशीर केल्याबद्दल शाळा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते असेही अधिकाऱ्याने सूचित केले.
तामिळनाडूच्या शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना
तामिळनाडूच्या शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या मालिकेतील सालेम प्रकरण हे नवीन आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर चिंता निर्माण झाली आहे. या राज्यात, अण्णा विद्यापीठातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यात अलीकडेच संतापाची लाट उसळली. जिथे कॅम्पसमध्ये एका महिला विद्यार्थिनीवर हल्ला करण्यात आला. या घटनेने राजकीय वाद निर्माण केला, विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि भाजपने द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या हाताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी हा द्रमुकचा समर्थक असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाने अधिक लक्ष वेधले.
तामिळनाडूमध्ये या आधीही अशा अनेक घटना
दरम्यान, अलिकडच्याच एका POCSO प्रकरणात, त्रिची येथील मुख्याध्यापिकेसह पाच शाळेतील अधिकाऱ्यांना एका चतुर्थ वर्गातील मुलीचा लैंगिक छळ केल्याबद्दल अटक करण्यात आली. गुरुवारी, एका महिला सहकाऱ्याने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर चेन्नईच्या सहआयुक्त पदावरील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
राजकीय प्रतिक्रिया आणि सरकारचे उत्तर
लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की या घटना द्रमुक सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेतील घसरण दर्शवितात. तथापि, सत्ताधारी पक्षाने हे दावे फेटाळून लावले आहेत, त्यांनी यावर भर दिला आहे की जलद अटक आणि कठोर कायदेशीर कारवाई हे दर्शवते की पीडितांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
कायदा मंत्री एस. रेगुपथी यांनी सरकारच्या भूमिकेचा बचाव करताना म्हटले आहे की, बचेलेल्यांना आमच्या सरकारवर विश्वास आहे. म्हणूनच ते पुढे येतात आणि या गुन्ह्यांची तक्रार करतात. आम्ही सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल याची खात्री करू. सालेम प्रकरणात चौकशी सुरू असताना, संपूर्ण तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आणि न्याय सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत
महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला – 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन - 1091/1291.
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 8577 05:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

