Tamil Nadu: अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्याने POCSO कायद्याअंतर्गत 24 वर्षीय महिलेला अटक
पलंबरु जिल्ह्यातील कुन्नम येथील एका 24 वर्षीय महिलेने 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्याने तिला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Tamil Nadu: पलंबरु जिल्ह्यातील कुन्नम येथील एका 24 वर्षीय महिलेने 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्याने तिला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. महिला ही अरियालूर जिल्ह्यातील उदयरपालयम तालुक्यात असलेल्या एका शासकीय शाळेत दोन वर्षांपूर्वी शिक्षकाच्या पदासाठी ट्रेनिंगसाठी लागली होती.(लहान मुलांना असेच वाऱ्यावर सोडून देण्यात दिल्ली अव्वल; महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा ही समावेश-NCRB)
पोलिसांनी पुढे असे म्हटले की, तेथे तिने 15 वर्षीय मुलासोबत रिलेशनशिप ठेवले. त्यानंतर 22 ऑक्टोंबरला त्या दोघांनी पालकांना काही न सांगता गंगाईकोंडाचोलापुरम येथे गुपचुप लग्न केले. त्याच दिवशी रात्री मुलाच्या आजीकडे ते दोघेजण घरी कोणीही नसताना तेथे जाण्यासाठी निघाले.
मुलाला आपली आजी घराची किल्ली कुठे ठेवते हे माहिती होते. तर मुलगा खुप वेळ झाल्याने घरी आल्याने त्याला फोन करुन तो कुठे आहे हे विचारण्यात आले. तेव्हा मला एका महिलेवर प्रेम जडले असून तिला आजीच्या घरी आणल्याचे त्याने त्याच्या आईला फोनवर सांगितले. मुलीच्या पालकांकडून सुद्धा तिचा शोध घेण्यास सुरुवात झाली. परंतु नंतर त्यांना सुद्धा त्या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सांगण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले.(POCSO Court: भिंन्नलिंगी मैत्रीण म्हणजे लैंगिक इच्छापूर्तीची उपलब्धी नव्हे- पॉक्सो कोर्ट)
पोलिसांच्या मते, त्या दोघांबद्दल जर पालकांना कळल्यास त्यांना विभक्त केले जाईल या भीतीने त्यांनी स्वत:चा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कथित माहितीनुसार त्यांनी महिलेला कुन्नम पीएचसीमध्ये नेले तेथून ते दुचाकीवरून पेरांबलूर GH येथे गेले. महिनाभर उपचार केल्यानंतर ते दोघे आपापल्या घरी परतल्याचे पोलिसांनी सांगितले. असा प्रकार पुढे घडू नये यासाठी मुलाच्या वडिलांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच महिलेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.