Tamil Nadu Chopper Crashed: सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
सेनेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. असे सांगितले जात आहे की, त्यामध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते.
Tamil Nadu Chopper Crashed: तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात कन्नूर मध्ये दुर्घटना घडली आहे. सेनेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. असे सांगितले जात आहे की, त्यामध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते. त्याचसोबत बिपिन रावत यांची पत्नी सुद्धा त्यामध्ये होती.(Military chopper Crashes in Tamil Nadu: लष्कराचं दुर्घटनाग्रस्त हेलिकॉपटर कोसळल्यानंतर आग; See Video)
स्थानिक सैन्याने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी असे म्हटले की, त्यांनी 80 टक्के जाळेल्या दोघांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि ओळख तपासण्याचे प्रयत्न सुरू आहे असे सुत्रांनी म्हटले आहे.
Tweet:
या दुर्घटनेप्रकरणी आता अधिक चौकशी केली जाणार असल्याचे भारतीय वायूसेनेने स्पष्ट केले आहे.
Tweet:
Tweet:
दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने तीन लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. परंतु आता जखमी झालेल्यांना नजीक असलेल्या सेनेच्या वेलिंग्टन बेस मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.