IPL Auction 2025 Live

Swiggy Delivery Executives आता मिळणार मोफत रूग्णवाहिकेची सोय; Dial4242 च्या सोबतीने नवी सुविधा

Dial4242 Ambulance Services यांच्यासोबत टाय अप करून स्विगी ही अ‍ॅम्ब्युलंस सेवा देणार आहे.

Swiggy (Photo Credits: PTI)

देशभर फूड डिलेव्हरी साठी धावपळ करणार्‍या स्विगी डिलेव्हरी एक्झिक्युटीव्ह्जना (Swiggy  Delivery Executives) आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍यांना मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा (Free Ambulance Service) मिळणार आहे. 16 जानेवारीला 'स्विगी' कडूनत्याची घोषणा करण्यात आली आहे. डिलेव्हरी एक्झिक्युटीव्हजना टोल फ्री नंबर वर किंवा SOS button वर ही सेवा मोफत मिळणार आहे. दरम्यान फूड डिलेव्हरी करताना त्याच्या पूर्वी किंवा नंतर अशा कोणत्याही वेळी फ्री अ‍ॅम्ब्युलंस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्विगी फूड डिलेव्हरी पार्टनर्सना कामाचा ठिकाणी अपघात होण्याचा किंवा कामाच्या ताणामुळे, धावपळीमुळे काही धोका संभवू शकतो. अशा वेळी त्यांच्या मदतीला अ‍ॅम्ब्युलंस सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. कर्मचार्‍यासोबतच त्याची पत्नी / पती आणि 2 मुलांना ही सोय मिळणार आहे. Dial4242 Ambulance Services यांच्यासोबत टाय अप करून स्विगी ही अ‍ॅम्ब्युलंस सेवा देणार आहे. नक्की वाचा: पाळीव कुत्र्याला घाबरून Swiggy Delivery Boy ने तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; गंभीर दुखापतींमुळे प्रकृती चिंताजनक. 

Co-Founder of Dial4242, Jeetendra Lalwani यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो डिलेव्हरी एक्झिक्युटीव्ह आपण रस्त्यावर फूड डिलेव्हरीसाठी धावपळ करत असताना पाहत असतो. पण '911' सारखी तात्काळ मदतीची विश्वासार्ह यंत्रणा नसल्याने अनेकदा 'वेळ' गमवावी लागते. पण आता Dial4242 ही स्वीगीच्या एक्झिक्युटीव्हसाठी वेळेवर उपचार व्हावेत यासाठी नजिकचं कॅशलेस हॉस्पिटल शोधेल. त्यांच्यावर उपचार सुरू होईपर्यंत ती थांबेल.