भारत-पाकिस्तान तुलनेत कोणाची सैन्य शक्ती किती? जाणून घ्या
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान अधिकच चेतावला असून पाकच्या वेगवेगळ्या कुरापती सुरुच आहेत.
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान अधिकच चेतावला असून पाकच्या वेगवेगळ्या कुरापती सुरुच आहेत. आज पाकिस्तानची तीन विमाने भारताच्या हद्दीत घुसली होती. मात्र भारतीय वायुदलाची सतर्कता पाहता या विमानांनी धूम ठोकली. यात पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडण्यात भारतीय वायुसैन्याला यश आले. इतके सगळे होऊन पाकिस्तान वारंवार युद्धाची भाषा करत आहे. भारताला तोडीस तोड उत्तर देण्यावर पाकिस्तानचे अनेक नेते बोलले. मात्र यापूर्वी झालेल्या चारही युद्धात पाकिस्तानचा भारतासमोर टिकाव लागला नाही. यापुढेही भारताशी युद्ध करणे पाकिस्तानला महागात पडणार आहे.
भारतीय सैन्याचे तीनही दल ताकदवान आहेत. भूदल, वायुदल आणि जलदल यांची ताकद पाहता पाकिस्तानला युद्धात आपण लोळवू शकतो. तर जाणून घेऊया दोन्ही देशांची सैन्य शक्ती...
भारतीय सैन्याची ताकद
भारतीय सैन्यातील सैनिकांची संख्या सुमारे 13 लाख आहे. भारताकडे एकूण 2187 विमानं आहेत. यात 590 लढाऊ विमानं, ट्रेनिंगसाठी 251 तर वाहतूकीसाठी 708 विमानं आहेत. याशिवाय 720 हेलीकॉप्टर्स आहेत यात 15 लडाऊ हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. भारतीय सैन्याकडे सुमारे 6 हजार टॅंक (Tank) आहेत. त्यापैकी 4 हजार आर्मड कॅरिअर आणि बीएमपी मशीन आहेत. नवी ताफे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सैन्यात सामिल करण्यात आले आहेत.
भारतीय वायुसैना ही जगातील चौथी सर्वात मोठी वायुसैना आहे. भारतीय सेनेजवळ ब्रह्मोस, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नाग यांसारखी अत्याधुनिक मिसाईल्स आहेत. इतकंच नाही तर भारतात 9 प्रकारचे ऑपरेशनल मिसाईल्स असून त्यात 3000 ते 5000 किमी क्षमतेचे अग्नि मिसाईलचा समावेश आहे.
पाकिस्तानी सैन्याची ताकद
पाकिस्तानी सैन्य हे भारताच्या निम्मे म्हणजे साडे सहा लाख इतके आहे. पाकिस्तान जवळ 1,281 विमानं आहेत. यात 320 लडाऊ, 410 जंगी, 486 ट्रेनर आणि 296 वाहतुक विमानांचा समावेश आहे. तर 328 हेलिकॉप्टर्स आहेत. 2005 च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानजवळ 3200 तोफा आहेत. तर पाकिस्तानकडे गौरी, शाहीन, गजनवी, हल्फ आणि बाबर यांसारखी मिसाईल्स आहेत. पाकिस्तानकडे केवळ 2182 टॅंक (Tank) आहेत.
यातून पाकिस्तानपेक्षा भारत अधिक शक्तीशाली असल्याचे दिसून येते.