Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार

Muslim Personal Law | Photo Credits: Twitter

सर्वोच्च न्यायालयाने आज अयोद्धा प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देताना वादग्रस्त जमीन रामलल्लांची असल्याचं सांगत तेथे मंदीर बांधण्यसाठी सरकारला ट्र्स्ट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तर मुस्लिमांना अयोद्धेमध्ये पर्यायी 5 एकर जागा देऊन तेथे मशीद उभारण्याचा निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयानंतर 'मुस्लीम पर्सनल लॉ' (All India Muslim Personal Law Board)  ची पत्रकार परिषद पार पडली. त्यानंतर आम्ही निर्णयाचं स्वागत करतो मात्र हा निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचं म्हटलं आहे. Ayodhya Judgment: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय; वादग्रस्त जमीन रामलल्लाची, मशिदीसाठी पर्यायी 5 एकर जमीन.

मुस्लीम पक्षकारांनी वकिलांशी चर्चा करणार सोबतच मुस्लीम पर्सनल लॉ सोबत या निकालाबद्दल बोलणी केली जाणार आहेत. त्यानंतर निर्णयाला आव्हान देण्याबाबत ठरवू असेही मुस्लिम पक्षकारांनी म्हटलं आहे. 1956-57 पूर्वी नमाजपठणाचे पुरावे नाहीत. वादग्रस्त जागेवर हिंदूंकडून चौथऱ्यावर पुजा करण्यात आल्याचं निरीक्षण न्यायाकडून आज निकालवाचनामध्ये सांगण्यात आलं आहे.

ANI Tweet

दरम्यान अयोध्या प्रकरणी निकालानंतर मुंबई,महाराष्ट्र सह देशभरात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आला आहे.