Sunita Williams Returns: सुनिता विलयम्स चं मूळगाव गुजरातच्या महेसाणा मध्ये नासा च्या अंतराळवीरांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना; लॅन्डिंग नंतर दिवाळी प्रमाणे सोलिब्रेशनची तयारी

नऊ स्पेसवॉक्स 62 तास पूर्ण केल्यानंतर, विल्यम्सने महिला अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे.

Sunita Williams Returns: सुनिता विलयम्स चं मूळगाव गुजरातच्या  महेसाणा मध्ये नासा च्या अंतराळवीरांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना; लॅन्डिंग नंतर दिवाळी प्रमाणे सोलिब्रेशनची तयारी
Sunita Williams' ancestral village in India | X@ANI

नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर 9 महिने अवकाशात अडकल्यानंतर अखेर आज पृथ्वीवर परतण्यासाठी झेपावली आहे. सुनिता विल्यम्स (Sunita Williams) आणि वूच विल्मोर यांच्या पुन्हा पृथ्वीवर येण्याकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. सुनिता विल्यम्स यांचे वडील मूळचे गुजरात मधील आहे. झूलासन  गावामधील मेहसणा जिल्ह्यामध्ये सुनिताच्या परतीच्या प्रवासासाठी सध्या प्रार्थना सुरू आहेत. बुधवार 19 मार्चच्या पहाटे 3 च्या सुमारास सुनिता पृथ्वीवर परतणार आहे. महेसाणा गावामध्ये हा दिवस एका दिवाळी प्रमाणे साजरा करण्यासाठी गावकरी सज्ज आहेत. नक्की वाचा: भारतीय वंशाच्या NASA अंतराळवीर Sunita Williams यांना PM Narendra Modi यांचं खास पत्र; भारत भेटीचं आमंत्रण .

गुजरात मध्ये सुनिता विल्यम्सच्या वडिलांचं गाव

सुनिता विल्यम्स हे वडील दीपक पांड्या हे गुजरातचे आहेत. सध्या सुनिताच्या सुरक्षित प्रवासासाठी गावातील मंडळी प्रार्थना करत आहेत. अनेक गावकर्‍यांनी अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. स्थानिक डोला माता मंदिरातही भाविकांनी सुनितासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे.

"आम्ही सुनीता विल्यम्सच्या फोटो सह एक मिरवणूक आयोजित केली आहे आणि मंदिरात प्रार्थना जप करणार आहोत. आम्ही तिच्या सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी प्रार्थना करत आहोत आणि अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. ही ज्योत बुधवारी देवी डोला मातेला पृथ्वीवर परतल्यानंतर अर्पण केली जाईल," असे विल्यम्सचे चुलत भाऊ नवीन पंड्या म्हणाले आहेत.

"गुजरात मध्ये वातावरण उत्साही आहे, प्रत्येकजण तिच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहे. भविष्यात आम्ही तिला झुलासनला भेट देण्यासाठी नक्कीच आमंत्रित करू. तिच्या वडिलोपार्जित गावात तिला आपल्यासोबत असणे हा एक सन्मान असेल," असे नवीन पंड्या म्हणाले आहेत.  Sunita Williams Returns: सुनिता विल्यम्स चा परतीचा प्रवास सुरू; पहा कधी, कुठे उतरणार पृथ्वीवर? 

सुनिता विल्यम्सच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना

नऊ स्पेसवॉक्स 62 तास पूर्ण केल्यानंतर, विल्यम्सने महिला अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे.  8  दिवसांच्या कामासाठी अवकाशात गेलेली सुनिता विल्यम्स आता 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहे.  यानामधील तांत्रिक बिघाडामुळे तिचा अवकाशातील प्रवास लांबला मात्र आता अखेर एलन मस्क यांच्या मदतीने नासा ने विशेष मोहिम हाती घेत दोघांनाही पृथ्वीवर परत आणण्यासाठी धडपड केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement