Jandhan Account: जनधन खात्यावर तब्बल 27 हजार कोटी जमा, विटभट्टी कामगार झाला रातोरात अरबपती
दिवसाला केवळ 600 रुपये कमावणारा मजूर रातोरात अरबपती झाला आहे.
मोदी सरकारकडून (Modi Government) भारतीय नागरिकांना काढायला लावलेल्या जनधन खात्यावर (Jandhan Account) कायमच विरोधकांकडून मोठी टिकेची झोड उठते. गरजुंना या खात्याचा काहीही फायदा झालेला नाही अशा विविध प्रतिक्रीया उमटताना दिसतात. पण एका विट्टाभट्टी मजूरास मात्र या जनधन खात्याचा मोठा फायदा झाला आहे. दिवसाला केवळ 600 रुपये कमावणारा मजूर रातोरात अरबपती झाला आहे. या मजूराच्या जनधन खात्यावर तब्बल 27 हजार कोटी जमा झाल्याचा मेसेज (Message) त्याच्या मोबाईलवर (Mobile) आला आहे. त्याचं झालं असं हा मजूर त्याच्या जनधन खात्यातून 100 रुपये काढण्यास गेला आणि ठरवल्याप्रमाणे त्याने त्याच्या अकाउंटमधून 100 रुपये काढले देखील पण त्यानंतर जे काही घडलं ते फारच आश्चर्यचकित करणारं होतं.
मजूराने ठरल्याप्रमाणे त्याच्या जनधन अकाउंटमधून 100 रुपये काढल्यानंतर त्याला त्याच्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर (Register Mobile Number) एक मेसेज आला ज्यात त्याच्या अकाउंटमध्ये (Account) उपलब्ध राशी 27 हजार कोटी असल्याचं नमूद केलं होत. त्यानंतर अचंबीत होवून या मजूराने त्याचं अकाउंट बॅलेंस (Account Balance) त्याच्या बॅंक स्टेटमेंटद्वारे (Bank Statement) मित्राला पडताळायला सांगितलं तर खरचं त्यात 27 हजार कोटी ऐवढी उपलब्ध राशी दाखवत होती. संबंधीत पडताळणी दोन ते तीन वेळेस केली असता 27 हजार कोटीचं दाखवत होती.
त्यानंतर या मजूराने थेट बॅंक गाठली आणि तिथे जाऊन उपलब्ध बॅलेन्स चेक करता त्याच्या अकाउंमध्ये केवळ 126 रुपये शिल्लक राशी होती. अशा प्रकारे या मजूराचा आनंद फार वेळ टिकला नसला तरी बॅंक मॅनेजर (Bank Manager) बरोबर संवाद साधला असता ते म्हणाले हा एक बॅंक Error असुन आम्ही काही दिवसांसाठी या मजूराचं अकाउंट डिअक्टीव्हेट (Deactivate) केलं आहे. तरी ज्या मजूराबरोब हा सगळा प्रकार घडला आहे त्याचं नाव बिहारी लाल (Bihari Lal) असुन तो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रहिवासी आहे आणि राजस्थानातील (Rajasthan) विटभट्टीवर कामाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)