JEE Aspirant: कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; बिहारमधील 16 वर्षीय विद्यार्थ्याची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

कोटामध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

JEE Aspirant: राजस्थानमधील कोटा हे आयआयटी-जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दुसरे घर मानले जाते. जिथे देशभरातून विद्यार्थी येतात आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयआयटी-जेईईची तयारी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण(JEE Student Suicide) वाढत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या बातम्या समोर येत आहेत. कोटामध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास (Hanging) घेत आत्महत्या केली. (IIT Student Commits Suicide: IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या,पोलिसांकडून तपास सुरु)

वर्षभरात कोटामध्ये आत्महत्येची 26 प्रकरणे समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील 16 वर्षीय मुलगा, जो आयआयटी-जेईईची तयारी करत होता. शुक्रवारी कोटा शहरातील विज्ञान नगर पोलीस स्टेशन परिसरात त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून विद्यार्थ्याने हे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

वैशाली जिल्ह्यातील रहिवासी

मृत विद्यार्थी एप्रिलपासून कोटा येथील कोचिंग संस्थेत आयआयटी जेईईची तयारी करत होता. शुक्रवारी हा मुलगा वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

नोव्हेंबरमध्येही एका विद्यार्थ्याची आत्महत्या

गेल्या महिन्यातही कोटा येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील अन्नूपूर येथील 18 वर्षीय विवेक कुमारने आत्महत्या केली होती. या प्रकरणातही विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपअधीक्षक योगेश शर्मा यांनी सांगितले की, मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif