Mann Ki Baat: थांबा, विचार करा आणि कृती करा! डिजिटल अटक टाळण्यासाठी मोदींनी दिला मंत्र; मन की बातमध्ये पंतप्रधान काय म्हणाले? वाचा सविस्तर
डिजिटल अटकेच्या नावाखाली देशात सुरू असलेल्या फसवणुकीच्या खेळाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने तपास यंत्रणा काम करत आहेत. राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना करून या संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं.
Mann Ki Baat: आज, 'मन की बात' (Mann Ki Baat) च्या 115 व्या भागात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला डिजिटल अटक (Digital Arrest) बद्दल जागरुक केले. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, प्रत्येक वयोगटातील आणि प्रत्येक वर्गातील लोक या धोकादायक समस्येचे बळी आहेत. भीतीमुळे लोक कष्टाने कमावलेले लाखो रुपये गमावत आहेत. असा फोन आला तर घाबरू नका. तुम्हाला माहित असले पाहिजे की कोणतीही तपास यंत्रणा कधीही फोन कॉल किंवा व्हिडिओद्वारे अशा प्रकारची चौकशी करत नाही. कायद्यात डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही. ही फक्त फसवणूक आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या हे करत आहेत.
डिजिटल अटकेच्या नावाखाली देशात सुरू असलेल्या फसवणुकीच्या खेळाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने तपास यंत्रणा काम करत आहेत. राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना करून या संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. (हेही वाचा -Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत भाजपेच 40 स्टार प्रचारक? जाणून घ्या)
डिजिटल अटक टाळण्यासाठी मोदींनी दिला मंत्र -
रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर -
मन की बात कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, कुवेतमधील श्री अब्दुल्ला अल-बरुन यांनी रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर केले आहे. हे काम निव्वळ भाषांतर नाही तर दोन महान संस्कृतींमधील पूल आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अरब जगतात भारतीय साहित्याची नवीन समज विकसित होत असल्याचंही यावेळी मोदींनी नमूद केलं. (हेही वाचा - Free Fortified Rice: पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा डिसेंबर 2028 पर्यंत सुरु राहणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी)
ॲनिमेशनच्या जगात भारतात एक नवी क्रांती - पंतप्रधान मोदी
स्मार्टफोनपासून सिनेमाच्या स्क्रीनपर्यंत, गेमिंग कन्सोलपासून व्हर्च्युअल रिॲलिटीपर्यंत सर्वत्र ॲनिमेशन आहे. ॲनिमेशनच्या जगात भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग स्पेसही वेगाने विस्तारत आहे. भारतीय खेळही सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत, असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)