Stock Market Today: चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा देताच शेअर बाजारात तेजी
बहुमतासाठी आणखी 32 जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये 16 खासदार निवडून आले आहेत.
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एनडीएबरोबर राहणार असल्याचे सांगितल्यानंतर शेअर बाजारात (Stock Market) तेजी आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. “मी या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. आम्ही एनडीएसोबत आहोत. मी एनडीएच्या बैठकीला जात आहे. यादरम्यानच्या काळात जर काही असेल तर आम्ही तुम्हाला कळवू.” असे चंद्राबाबू नायडूंनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. भाजपा 240 जागांवर मर्यादीत राहिल्यामुळे त्यांना आणखी 32 जागांची गरज आहे. अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहणार असल्याचे सांगताच शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली. (हेही वाचा – Share Market Crash: शेअर बाजारात मंदी! सर्व बँकिंग स्टॉक्स कोसळले; लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादरम्यान SBI, बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरले)
एक्झिट पोलच्या विरुद्ध असे निकाल हाती येत असताना शेअर बाजाराचा निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक खाली पडलेला दिसला. सेन्सेक्सने तब्बल 6000 अंशांहून अधिक घसरण पहायला मिळाली होती. आज चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहण्याचा विश्वास व्यक्त केल्यानंतर निफ्टीमध्ये दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
पाहा व्हिडिओ –
लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 240 जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी 32 जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये 16 खासदार निवडून आले आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये 12 खासदार निवडून आले आहेत. भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे 5 खासदार निवडून आले आहेत. तर महाराष्ट्रात शिंदे गटाचे 7 खासदार आहेत.