LIC at New Low: एलआयसी समभागांची घसरगुंडी थांबेचना, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

एलआयसीची आयपीओ (LIC IPO) लॉन्च झाल्यापासून सुरु झालेली घसरगुंडी थांबण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे.आज (6 जून) दुपारी 12.30 च्या सुमारास एलआयसी समभाग 1.94% घसरणीसह 784.75 रुपयांवर (LIC Share Price) ट्रेंड करत होता.

LIC | (File Image)

भारतीय जीवन विमा अर्थातच एलआयसी समभाग (LIC Share) बाजारात आज पुन्हा एकदा नव्या गर्तेत अडकले. एलआयसीची आयपीओ (LIC IPO) लॉन्च झाल्यापासून सुरु झालेली घसरगुंडी थांबण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे.आज (6 जून) दुपारी 12.30 च्या सुमारास एलआयसी समभाग 1.94% घसरणीसह 784.75 रुपयांवर (LIC Share Price) ट्रेंड करत होता. एलआससी शेअर प्रथमच 800 रुपयांच्या खाली गेला आहे. एलआयसी आयपीओ बाजारात दाखल झाल्यापासून तो सातत्याने घरसत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी अशी एलआयसीची ओळख आहे. या कंपनीचे मार्केट कॅपीटलायजेशनही (LIC Market Cap.) पाच लाख कोटींहून कमी आले आहे.

एलआसयीसेच मार्केट कॅपीटल सध्यास्थितीत 4.96 लाख कोटी रुपये पोहोचले आहे. एलआयसीचा आयपीओ जेव्हा सरकारने आणला होता तेव्हा कंपनीचे मार्केट कॅपीटल 6 लाख रुपये इतके होते. सध्यास्थितीत मात्र एलआयसीने गुंतवणुकदारांचे जवळपास 1.4 लाख रुपये डुबले आहेत. एलआयसी समभागाने गुंतवणुकदारांचे मोठेच नुकसान केल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, LIC IPO Listing: एलआयसी समभाग पदार्पणातच कोसळला, पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची निराशा, पाहा कितीवर लिस्ट झाला LIC Share)

एलायसी समभागाची इश्यू प्राईज 949 रुपये होती. बाजारात दाखल झाल्यापासून (LIC Policyholders) तो सातत्याने घसरत आहे. मत्र प्रथमच तो 800 रुपयांच्या खाली गेला आले. आतापर्यंत एलआयसी समभागामध्ये 17% घसरण पाहायला मिळत आहे. एलआयसीच्या पॉलिसीहोर्डर्सनी (LIC Policyholders) आणि रिटेल गुंतवणुकदारांनी आयपीओला चांगला प्रतिसाद दिला होता. कंपनीने पॉलिसीहोल्डर्सना 60 रुपयांची सवलतही दिली होती. त्यामुळे एलआयसी पॉलिसीहोर्डर्स श्रेणीत सहापटीने वाढ झाली होती. असे असले तरी सध्याची कामगिरी पाहता एलआयसीने मात्र गुंतवणुकदारांची चांगलीच निराशा केली आहे.

शेअर बाजाराच्या अभ्यासकांचे म्हणने असे की, एलआयसी शेअर आगामी काळात आणखी घसरु शकतात. 16 जूनला एंकर इन्वेस्टर्सचा लॉक-इन पीरियड संपतो आहे. त्यामुले त्यानंतर ते एलआयसी शेअर विक्री करु शकतात. अशा वेळी एलआयसीचा शेअर आणखी घसरु शकतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif