Alert: 'स्टेट बँक ऑफ इंडिया' च्या ATM मधून पैसे काढताना 1 जानेवारी पासून लागू होणार 'हा' नियम; जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी येत्या नववर्षात एक नवा नियम घेऊन येणार आहे, यानुसार, यापुढे कोणत्याही ग्राहकाला आपल्या एटीएम (SBI ATM) मधून पैसे काढायचे झाल्यास त्याला वन टाइम पासवर्ड (OTP) टाकणे अनिवार्य असेल.

ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी येत्या नववर्षात एक नवा नियम घेऊन येणार आहे, यानुसार, यापुढे कोणत्याही ग्राहकाला आपल्या एटीएम (SBI ATM) मधून पैसे काढायचे झाल्यास त्याला वन टाइम पासवर्ड (OTP)  टाकणे अनिवार्य असेल. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. Alert: SBI चे जुने डेबिट कार्ड 31 डिसेंबरपूर्वी बंद होणार; नवीन कार्ड मिळवण्यासाठी 'असा' कसा अर्ज

नवीन वर्षापासून 10 हजार आणि त्यापेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात येणार आहे. अनधिकृत पैसे काढण्याच्या घटनांवर रोख बसवण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत सध्या ग्राहकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम असल्याने आज आम्ही आपल्याला या निर्णयाचे महत्वाचे मुद्दे सांगणार आहोत..

1. ग्राहकांनी बँकेत नोंदवलेल्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहे.

2. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या डेबिट कार्ड किंवा अकाउंट मध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नाही.

3. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत एटीएममधून पैसे काढताना हा नियमी लागू होणार आहे.

4.हा निर्णय केवळ 10 हजाराच्या वरील व्यवहारासाठी लागू होणार आहे.

5.अन्य बँकांच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी हा नियम लागू होणार नाही. हा निर्णय तूर्तास केवळ एसबीआय तर्फे घेण्यात आलेला असून अद्याप National Financial Switch (NFS) अंतर्गत याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, एसबीआय तर्फे घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होणार आहे. देशातील सर्व एसबीआय एटीएम मध्ये ही सुविधा असणार आहे.