Stage Collapses During Political Rally: बिहारमध्ये निवडणूक प्रचाराच्या भाषणादरम्यान अचानक कोसळले स्टेज; कॉंग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी आणि अखिलेश सिंह पडले खाली (Watch Video)
प्रचारादरम्यान, व्यासपीठावर भाषणे देत नेते मंडळी सरकार पाडण्याचे दावे करत आहेत. प्रचारादरम्यान अनेक चित्र विचित्र गोष्टी घडतात ज्या क्षणार्धात व्हायरल होतात.
बिहारमध्ये निवडणूक (Bihar Elections) प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारादरम्यान, व्यासपीठावर भाषणे देत नेते मंडळी सरकार पाडण्याचे दावे करत आहेत. प्रचारादरम्यान अनेक चित्र विचित्र गोष्टी घडतात ज्या क्षणार्धात व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ समोर येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम चंपारणमधील (West Champaran) बागाही देवराज (Bagahi Deoraj) येथे कॉंग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत, गुरुवारी स्टेज (Stage) तुटून खाली कोसळले. यावेळी कॉंग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) आणि अखिलेश सिंह (Akhilesh Singh) यांच्यासमवेत पक्षाचे अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
स्टेज खाली कोसळताच एकच गोंधळ उडाला. प्राप्त माहितीनुसार स्टेज कोसळल्याने कॉंग्रेसचे नेता, प्रख्यात शायर इम्रान प्रतापगढी आणि अखिलेश सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना दुखापत झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इम्रान प्रतापगढी आणि अखिलेश सिंग अनेक कार्यकर्त्यांसह स्टेजवर उभे राहून एक कविता गात आहेत. शेवटच्या चार ओळी सुरु असताना अचानक स्टेज हलायला लागले व काही कळायच्या आता स्टेज कोसळलेही. यावेळी स्टेजवर फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते व त्यामुळेच इतके जास्त वजन स्टेजला पेलवले नाही. (हेही वाचा: Chirag Paswan Viral Video: वडील रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुलगा चिरागने केली रिहर्सल; पहा व्हायरल व्हिडिओ)
पहा व्हिडिओ -
यावेळी सभेसाठी शेकडोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. स्टेज कोसळल्यानंतर एकच हल्लकल्लोळ माजला व घटनेचा व्हिडिओ शूट करण्यासाठी लोकांची धावपळ उडाली. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार मशकूर अहमद उस्मानी हे नितीश सरकार यांना पाडण्याची भाषा करत कार्यकर्त्यांसह मंचावर उभे होते तेव्हा त्यांचाही स्टेज अचानक कोसळला. दरभंगाच्या जाला येथे निवडणूक सभा घेताना ही घटना घडली. उस्मानी हे भाजपचे दिवेश कुमार यांच्या विरोधात आहेत.
योगायोगाने, अहमद उस्मानी हे सरकार पडण्याची भाषा करत असतानाच स्टेज कोसळले. दरम्यान, याआधी लालू प्रसाद यादव स्टेजवर असतानाही स्टेज कोसळले होते.