Sputnik-V लस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार उपलब्ध, Apollo रुग्णालयात नागरिकांचे होणार लसीकरण

अशातच लसीकरणासाठी भारतात आणखी एक लस नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. रशियाची स्पुटनिक वी (Sputnik-V) लस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे.

Sputnik V vaccine | (Photo Credits: Yalçn Sonat /123rf)

कोरोना व्हायरसच्या विरोधात अद्याप लढाई सुरुच आहे. अशातच लसीकरणासाठी भारतात आणखी एक लस नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. रशियाची स्पुटनिक वी (Sputnik-V) लस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला ही लस अपोलो रुग्णालयात उपलब्ध असणार आहे. याचा माहिती अपोलो रुग्णालयाचे कार्यकारी उपाध्यक्ष शोभना कामिनेनी यांनी दिली आहे. सध्या भारतात सीरम इंस्टिट्युटची 'कोविशील्ड' आणि भारत बायोटेकची 'कोवॅक्सिन' लस नागरिकांना दिली जात आहे. या व्यतिरिक्त 'स्पुटनिक-वी' लस भारतात लवकरच नागरिकांना दिली जाणार आहे. त्याचसोबत याचे उत्पादन भारतात करण्याची सुद्धा तयारी केली जात आहे.

स्पुटनिक-वी ची लस प्रथम खासगी क्षेत्राला मिळणार आहे. कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरमॅन एनके अरोडा यांनी आजतक/इंडिया टुडेच्या खास बातचीत मध्ये म्हटले की, स्पुटनिक वी लस देशात जून मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच ती प्रथम खासगी क्षेत्राला दिली पाहिजे. या लसीच्या बॉटल्ससाठी एक निश्चित तापमान ठरवून तेथे ठेवणे गरजेचे आहे. एनके आरोडा यांनी पुढे असे म्हटले की, पुढील 3 महिन्यात देशाला 3 पट अधिक लस मिळणार आहे.(COVID19 Vaccine च्या दुसऱ्या डोसवेळी वेगळीच लस दिल्यास काय होईल? आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण)

कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरमॅन यांनी आजतक सोबत बातचीत करताना म्हटले की, फायजर, मॉडर्ना, जॉनसन अॅन्ड जॉनन ची लस सप्टेंबर पर्यंत उपलब्ध होईल.तर लहान मुलांच्या लसीकरणावर त्यांनी म्हटले, त्यांच्यावर भारत बायोटेकच्या ट्रायलचा रिजल्ट सप्टेंबर पर्यंत समोर येईल. वर्षाच्या अखेरीस सर्व लहान मुलांचे लसीकरण सुरु केले जाऊ शकते.(Fake COVID Vaccine App, Websites बाबत पुणे पोलिसांचा अलर्ट; ट्वीट करत नागरिकांना केलं सतर्क)

स्पुटनिक-वी च्या सप्लाय बद्दल लस निर्माते आणि दिल्ली सरकार यांच्यामध्ये बातचीत झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, निर्मात्यांनी दिल्लीला लसीचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, किती लस दिल्लीला मिळणार हे केजरीवाल यांनी स्पष्ट केले नाही.