Lucknow Add SP Son Death: अ‍ॅडिशनल एसपी च्या एकुलत्या एक मुलाचा करूण अंत; आईच्या डोळ्यादेखत भरधाव कारने उडवलं

आई श्वेता समोरच मुलाला उडवल्यानंतर त्यांनी स्वतःची गाडी आणली. मुलाला हॉस्पिटल मध्ये नेले. नामिशला वाचवण्याचे सारे प्रयत्न झाले पण डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तो वाचू शकला नाही.

Accident (PC - File Photo)

यूपी (UP)  मधील लखनौ (Lucknow) शहरात आज सकाळी एका अपघाताची काळीज पिळवटणारी घटना समोर आली आहे. लखनौ च्या अ‍ॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव (Additional SP Shweta Srivastava) यांच्या 9 वर्षीय एकुलत्या एक मुलाचं निधन झालं आहे. भरधाव वेगात आलेल्या गाडीने जनेश्वर मिश्र पार्क जवळ मुलाला उडवलं. आज सकाळी G-20 रोड वर कोच सोबत स्केटिंगचा सराव करताना अचानक भरधाव वेगात गाडी आली आणि त्याने मुलाला उडवलं. गाडीचा वेग इतका होता की नामिश हवेत 15 फीट उडाला. जमिनीवर कोसळल्यावर त्याच्या डोकं, पोट याला गंभीर दुखापत झाली. नाका-तोंडातून रक्त वाहायला लागले होते. अपघातानंतर कार चालक फरार आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने सध्या कारचालकाचा तपास सुरू आहे. यूपी पोलिस दलामध्ये एसपी श्वेता श्रीवास्तव इंदिरानगर मध्ये राहत होती, त्यांचा 9 वर्षांचा मुलगा नामिश रोज जनेश्वर मिश्रा पार्क मध्ये स्केटिंग करण्यासाठी जात होता. आजही पहाटे साडेपाचच्या सुमारास तो आई श्वेता सोबत पार्क मध्ये आला. स्केटिंग ट्रेनिंग दरम्यान जी-20 च्या रस्त्यावर प्रॅक्टिस करण्याचं ठरलं आणि हा भीषण अपघात झाला.

आई श्वेता समोरच मुलाला उडवल्यानंतर त्यांनी स्वतःची गाडी आणली. मुलाला हॉस्पिटल मध्ये नेले. नामिशला वाचवण्याचे सारे प्रयत्न झाले पण डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तो वाचू शकला नाही. Car Reverse Accident Video: मारूती 800 रिव्हर्स मध्ये जाऊन जेव्हा भिंतीवर आदळते; अपघाताचा व्हिडिओ वायरल (Watch Video) .

अ‍ॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांची सध्याची पोस्टिंग उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये Special Investigation Team सोबत आहे. मुलाच्या अपघाती निधनाने त्यांचं विश्व हादरलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement