Indore Dog Video: भरधाव कारची कुत्र्यांच्या पिल्लांना धडक, चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी (Watch Video)
रस्त्यावर खेळत असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना एका भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दोन पिल्लांचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Indore Dog Video: रस्त्यावर खेळत असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना एका भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दोन पिल्लांचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथील आहे. या घटनेनंतर कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- रस्ता ओलांडताना कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीची धडक, गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री इंदौर महादेवा तोतला नगर येथे घडली. पीपल फॉर अॅनिमल यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. भरधाव कारने रस्त्यावर खेळत असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना धडक दिली. या घटनेनंतर प्रियांशू जैन या नागरिकाने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. कारमध्ये बसलेल्या लोकांविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रात्रीच्या वेळीस कुत्र्यांची पिल्ले रस्त्यावर खेळत होती. अचानक एक कार आली आणि त्यांच्यावर अंगावर धावली. कारने पिल्लांना धडक देऊन तिथून फरार झाला. पिल्लांच्या आईने हा प्रकार पाहिल्यानंतर तिने धाव घेतला. दुर्दैवाने या घटनेत सहा पिल्लांपैकी दोन जण जागीच मरण पावले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांकडून प्रंचड निषेध केला जात आहे. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2024 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

