दिल्लीतील सर्वात मोठ्या Sex Racket ची ऑपरेटर सोनू पंजाबनला 24 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा; 'सर्व मर्यादा ओलांडल्या', शिक्षा सुनावताना कोर्टाने काढले उद्गार

राजधानी दिल्ली (Delhi) सह देशातील अनेक राज्यांमध्ये सर्वात मोठे सेक्स रॅकेट (Biggest Sex Racket) चालवणारी कुख्यात गीता अरोड़ा उर्फ ​​सोनू पंजाबन (Sonu Punjaban) हिला दिल्लीच्या द्वारका कोर्टाने, 24 वर्षांच्या तुरुंगवासाची (Imprisonment) शिक्षा ठोठावली आहे.

Sonu Punjaban (Photo Credits: Twitter|@UttarakhandKi)

राजधानी दिल्ली (Delhi) सह देशातील अनेक राज्यांमध्ये सर्वात मोठे सेक्स रॅकेट (Biggest Sex Racket) चालवणारी कुख्यात गीता अरोड़ा उर्फ ​​सोनू पंजाबन (Sonu Punjaban) हिला दिल्लीच्या द्वारका कोर्टाने, 24 वर्षांच्या तुरुंगवासाची (Imprisonment) शिक्षा ठोठावली आहे. तर तिचा सहकारी संदीप याला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने देह व्यापारात (Prostitution) ढकलण्याच्या आरोपाखाली सोनू पंजाबनला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. वेळी, तिचा साथीदार संदीपला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल आणि तिला जबरदस्तीने शरीर विक्री करण्यास भाग पाडल्याबद्दल शिक्षा सुनावली आहे.

या शिक्षेची घोषणा करताना कोर्टाने सांगितले की सोनू पंजाबनने, ‘एक महिला म्हणून घेण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि ती कठोर शिक्षेस पात्र आहे.’ दिल्लीच्या द्वारका कोर्टाने सोनू पंजाबन आणि संदीप यांना दोषी ठरवल्यानंतर, दोन दिवसानंतर तिहार तुरूंगात बंदिवान असलेल्या सोनू पंजाबने औषधे खाऊन आत्महत्येचे नाटक केले होते. पण तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि ती पूर्णपणे बरी झाली. (हेही वाचा: मुंबई: गोरेगाव परिसरातील एका हॉटेलमधील SEX रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह एक मॉडेल अटकेत)

2014 मध्ये दिल्लीच्या नजफगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सोनू पंजाबन आणि तिच्या सहा साथीदारांविरूद्ध अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शरीर व्यापारात ढकलल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, पण नंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, सोनूच्या कृत्यांना बळी पडलेली अल्पवयीन मुलगी भीतीमुळे बेपत्ता झाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पीडितेचा शोध घेतला आणि तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर, 2017 मध्ये सोनू पंजाबन आणि तिचा साथीदार संदीप यांना अटक करण्यात आली.

सोनू पंजाबन आणि संदीप यांच्यावर यापूर्वी आरोपपत्र दाखल केले गेले होते. यापूर्वी सोनू पंजाबनला एका प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. ती शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ही २४वर्षांची शिक्षा सुरु होईल. शिक्षेची सुनावणी करताना, कोर्टाने पीडित मुलीला 7 लाख रुपये देण्याचे फर्मान देखील जारी केले आहे.