Sonia Gandhi’s Mother Passes Away: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या मातोश्री Paola Maino यांचे इटलीमध्ये निधन; काल पार पडले अंत्यसंस्कार
काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गदारोळात, काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जागी नवीन पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आई पाओला माइनो (Paola Maino) यांचे शनिवारी 27 ऑगस्ट रोजी इटलीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी पाओला यांना अंतिम निरोप देण्यात आला. 24 ऑगस्ट रोजी काँग्रेसने एक निवेदन जारी केले होते की, सोनिया गांधी या राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी यांच्यासोबत परदेशात जाणार आहेत. नवी दिल्लीत परतण्यापूर्वी सोनिया आपल्या आजारी आईचीही भेट घेणार असल्याचे निवेदनात म्हटले होते.
गेल्या आठवड्यात सोनिया गांधी आपल्या आईला भेटायला गेल्या होत्या. हा दौरा वैद्यकीय तपासणीसाठी त्यांच्या परदेश दौऱ्याचा एक भाग होता, जिथे त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी वड्रा त्यांच्यासोबत होते. सोनिया गांधी अजूनही वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा गेल्या काही वर्षांत त्यांच्या आजीला भेटण्यासाठी अनेक वेळा इटलीला जात होते.
Smt. Sonia Gandhi’s mother, Mrs. Paola Maino passed away at her home in Italy on Saturday the 27th August, 2022. The funeral took place yesterday.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 31, 2022
2020 मध्ये, जेव्हा राहुल गांधींना त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांवरून काही टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यावर पक्षाने सांगितले होते की ते एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी वैयक्तिक कारणासाठी इटलीला गेले होते. (हेही वाचा: PM Modi: जाणून घ्या पंतप्रधान मोदींची लाईफस्टाईल, RTI मधून आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे)
दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गदारोळात, काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जागी नवीन पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार असेल तर, अशा स्थितीत 30 सप्टेंबरलाच निकाल जाहीर होऊ शकतो.
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2022 06:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

