Sonia Gandhi Health Update: सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर, पोटविकारांवरील उपचारांना सकारात्मक प्रतिसाद
Sonia Gandhi Medical Bulletin: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना पोटाच्या संसर्गासाठी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना एक नवीन आहार पद्धती (नवे डायट प्लॅन) सुरू करण्यात आली आहे आणि डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi Health Update) यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्या पोटदुखीच्या उपचारासाठी (Sonia Gandhi Stomach Infection) दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) भरती आहेत. डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, सोनिया गांधी उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, आजपासून त्यांच्यासाठी खास डायट प्लॅन सुरू करण्यात आला आहे. त्या अजूनही डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली आहेत.
लवकरच डिस्चार्ज, मात्र तारीख निश्चित नाही
डॉ. एस. नुंडी आणि डॉ. अमिताभ यादव यांच्या समावेश असलेले वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवून आहे. रुग्णालयाच्या अधिकृत निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले की, डिस्चार्जची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही. प्रकृतीनुसार निर्णय घेतला जाईल. सोनिया गांधी यांना 15 जून (रविवार) रोजी रात्री 9:00 वाजता रुग्णालयातील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात (Department of Surgical Gastroenterology) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटाशी संबंधित त्रासासाठी त्यांना तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. 16 जून रोजी डॉ. स्वरूप यांनी सांगितले होते की, त्या स्थिर असून, डॉक्टर त्यांची प्रकृती बारकाईने तपासत आहेत.
सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर- डॉक्टर
डॉक्टरांनी दिलेल्या अपडेटमध्ये पुन्हा सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांचे आहार व्यवस्थीत नियंत्रीत करण्यात आले असून त्या अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयातून अजून डिस्चार्ज करण्यात आलेले नाही. (हेही वाचा, Sonia Gandhi Hospitalised: ब्रेकिंग न्यूज! सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली समोर)
या आधीही प्रकृतिचा त्रास
दरम्यान, यापूर्वी 7 जून रोजीही सोनिया गांधी हिमाचल प्रदेशातील शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सामान्य तपासणीसाठी गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (माध्यम) नरेंद्र चौहान यांनी सांगितले की, त्या काही किरकोळ आरोग्य समस्यांमुळे शिमला दौऱ्यावर आल्या होत्या. सध्या डॉक्टर त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवून आहेत आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच रुग्णालयातून त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.
सोनिया गांधी या प्रदीर्घ काळ भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि केंद्रस्थानी व्यक्तिमत्त्व राहिल्या आहेत. त्या प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पत्नी आणि दिवंगत इंदिरा गांधी (माजी पंतप्रधान) यांच्या सून असल्याने आपसूकच त्यांच्याबद्दल देशभरात कुतुहल होते. शिवाय, राजकीय वर्तुळात आणि खास करुन काँग्रेस पक्षावर त्यांची मजबूत पकड राहील आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

