Shubh's India Tour Cancelled: भारतीय कॅनेडीयन गायक 'शुभ' चा भारत दौरा रद्द; Book My Show रिफंड करणार तिकीटाचे पैसे

10 वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि एका क्रूझवर रॅपर 'शुभ' चा पहिला-वहिला भारत दौरा जाहीर केला होता तो आता रद्द करण्यात आला आहे.

Singer Shubh | Insta

भारत-कॅनडा तणावाचे परिणाम आता दिसयला लागले आहे. सुरूवातील दोन्ही देशांनी राजदूतांना दूर केल्यानंतर दोघांनीही आपल्या दुसर्‍या देशात असलेल्या आपल्या नागरिकांना सांभाळून राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे सल्ले दिले आहेत. त्यानंतर आता बूक माय शो (Book My Show )कडून भारतीय-कॅनडा गायक, रॅपर 'शुभ' (Shubh) याच्या इंडिया टूर रद्द केल्याची घोषणा केली आहे. 'शुभ' हा खलिस्तानी संघटनांना आपला पाठिंबा देत असल्याने त्याला रोषाचा सामना करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी 'शुभ'ने भारताचा नकाशा शेअर केला होता. ज्यामध्ये जम्मू कश्मीर आणि पंजाब हे भाग वगळण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या या भुमिकेला भारतातून विरोध होत आहे. शुभ च्या इंडिया टूरची तिकीटं बूक माय शो वर उपलब्ध असल्याने #UninstallBookMyShow हा हॅशटॅग ट्रेंड करत त्यांचाही निषेध करण्यात आला होता. पण आता बूक माय शो कडून 'शुभ' ची इंडिया टूर रद्द झाल्याचं सांगत ज्यांनी तिकीटं बूक केली आहेत त्यांना पूर्ण रिफंड दिले जाईल असंही म्हटलं आहे. नक्की वाचा: Indian Govt Advisory For Students in Canada: तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणारे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नियमावली केली जाहीर .

शुभ हा 'खलिस्तानी' म्हणूनही प्रसिद्ध आहे. युट्युब वर त्याची अनेक गाणी हीट आहेत. 'स्टिल रोलिन' गाण्याच्या इंस्टाग्राम रीलने तो मोठ्या प्रमाणात प्रकाशझोकात आला. त्याने 2021 मध्ये त्याचे पहिले ब्रेकआउट सिंगल 'We Rollin' रिलीज केले आणि 2023 पर्यंत YouTube वर 201 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज झाले आहेत.

त्याने अलीकडेच त्याचा पहिला अल्बम 'स्टिल रोलिन' रिलीझ केला आणि 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि एका क्रूझवर त्याचा पहिला-वहिला भारत दौरा जाहीर केला. BookMyShow हे या इंडिया टूर चे स्पॉन्सरर आहेत. क्रिकेटर विराट कोहलीने देखील शुभ च्या वादग्रस्त पोस्ट नंतर त्याला अनफॉलो केले आहे.