Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड ची आरोपी Aftab Poonawalla कडून पॉलिग्राफ टेस्ट मध्ये पश्चाताप विना कबुली; अन्य मुलींसोबतचे संबंधही केले मान्य
आफताफने आपल्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली देतानाच तिच्या शरीराचे लहान लहान तुकडे करून दिल्ली आणि गुरूग्राम मध्ये जंगलात ते फेकल्याची देखील कबुली दिली आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder) ही सुन्न करणारी कहाणी म्हणजे निर्दयीपणाचा कळस आहे. आता या हत्याकांडातील आरोपी Aftab Amin Poonawalla याने हत्येची कबुली देऊन आणि फाशी झाली तरी बेहत्तर म्हणत क्रुरतेची परिसीमा गाठली आहे. सहा महिन्यांपूर्वी आपल्या 27 वर्षीय लिव ईन पार्टनरचा खून करून आता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोबतच अनेक मुलींसोबत आपले संबंध होते याची देखील माहिती पॉलिग्राफ टेस्ट मध्ये दिल्याचं Forensic Science Laboratory च्या सूत्रांनी दिली आहे. दिल्ली मध्ये काल (29 नोव्हेंबर) आफताबची पॉलिग्राफ टेस्ट झाली आहे.
आफताफने आपल्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली देतानाच तिच्या शरीराचे लहान लहान तुकडे करून दिल्ली आणि गुरूग्राम मध्ये जंगलात ते फेकल्याची देखील कबुली दिली आहे. FSL च्या सूत्रांच्या माहितीनुसार आफताब ला या गुन्ह्याबाबत कोणताही पश्चाताप नाही. श्रद्धाचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं हा आपल्या प्लॅनचाच एक भाग असल्याचं त्याने म्हटलं आहे. आता आफताबला 5 डिसेंबरला नार्को अॅनालिसिस टेस्ट साठी नेलं जाणार आहे. नक्की वाचा: Shraddha Walkar Murder Case: 'होय, श्रद्धा वालकर हिची हत्या केली', अफताब पूनावाला याची न्यायालयात कबुली; कोर्टात काय घडलं? 5 महत्त्वाचे मुद्दे .
पहा ट्वीट
दिल्ली न्यायालयाने आफताबच्या नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्टला परवानगी दिली आहे. मंगळवारी कडक बंदोबस्तामध्ये आफताबला पाचव्यांदा FSL office मध्ये आणण्यात आले होते. त्याला आणताना दिल्ली पोलिसांच्या व्हॅन वर काही लोकांनी तलवारीने देखील हल्ला केला होता. जनतेमधील रोष पाहता आता Border Security Force देखील FSL office बाहेर तैनात आहे.
दिल्ली पोलिसांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, आफताब तपासकर्त्यांची दिशाभूल करत आहे आणि चालू तपासात सहकार्य करत नाही. दिल्ली पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या बेपत्ताच्या तक्रारीच्या आधारे 12 नोव्हेंबर रोजी आफताब पूनावालाला त्याच्या मैत्रिणीची निर्घृण हत्या केल्याबद्दल अटक झाली.