लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता शॉपिंगची सुविधा
रेल्वे प्रशासन यासंबंधित नवी योजना करत आहे.
रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता शॉपिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासन यासंबंधित नवी योजना करत आहे. ही योजना लवकरच पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस मध्ये सुरु करण्यात येईल. मेसर्स एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 5 वर्षांकरीता 3.66 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. मुंबईकर रेल्वे प्रवाशांना 2019 पर्यंत Mumbai Local मध्ये Free WiFi मिळण्याची शक्यता
या योजनेनुसार, ट्रेनमध्ये 1 X 3 X 3 फूटांचे शॉपिंग कार्ट असतील. सोबत दोन सेल्समेन देखील असतील. हे सेल्समन कंपनी आयडीसह युनिफॉर्ममध्ये असतील. येथे प्रवासी कॅशसह क्रेडीट आणि डेबिट कार्डनेही शॉपिंग करु शकतील. शॉपिंगची ही सुविधा जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल. पहिल्या टप्प्यात तीन ट्रेन्समधून शॉपिंग सुविधेची सुरुवात होईल. यात मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसची निवड करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवाशांना सौंदर्य, होम आणि किच एप्लायन्सेस आणि फिटनेस सामुग्री आदी विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विक्रेत्यांना रेल्वे किंवा राज्य सरकारने बंदी घातलेले कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, तंबाखू, सिग्रेट आणि गुटखा यांसारखे उत्पादनं विकण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू पाहण्यासाठी प्रवाशांना कॅटलॉग देण्यात येतील.