Atiq Ahmed Death: अतिक आणि अश्रफ यांना मोठे गँगस्टर बनण्यासाठी मारल्याची शुटर्सची कबुली, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली एफआयआर
तिघा हल्लाखोरांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तिघेही उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येतात. या तिघांनी मोठे गँगस्टर होण्यासाठी या हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची पोलिसांच्या ताब्यात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात अतिक अहमद आणि अशर्रफ यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिघा हल्लाखोरांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तिघेही उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येतात. या तिघांनी मोठे गँगस्टर होण्यासाठी या हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
तीनही शूटर्सना यूपी पोलिसांनी ताबडतोब पकडले, तर एका पोलिसाला किरकोळ दुखापत झाली. यूपी पोलिसांच्या एफआयआरनुसार, तीन शूटर्सनी सांगितले की त्यांना गँगस्टरमधून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मारुन “लोकप्रिय आणि मोठे गुंड व्हायचे आहे” जेव्हा यूपी पोलिसांनी शूटर्सना त्यांच्या हेतूंबद्दल विचारले तेव्हा त्यांनी उघड केले की त्यांचा मुख्य उद्देश अतिक आणि अशरफची हत्या करून गुन्हेगारी जगतात आपला ठसा उमटवण्याचा होता. या दोघांच्या रिमांडची माहिती मिळाल्यापासूनच त्यांनी अतिक आणि अश्रफ यांना ठार मारण्याचा कट रचला होता.