Shocking! अवघ्या 1500 रुपयांसाठी मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या; विटेने ठेचून मारले

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने आई कुंतीबाई यांच्याकडे 1500 रुपये मागितले होते. यावर आईने सांगितले की, रेशन खरेदीसाठी ते पैसे खर्च झाले. आईचे हे उत्तर ऐकून मुलगा संतापला आणि पैसे न दिल्याने त्याने आईच्या डोक्यात वीट मारण्यास सुरुवात केली.

Shocking! अवघ्या 1500 रुपयांसाठी मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या; विटेने ठेचून मारले
Representational Image (File Photo)

बिलासपूरमध्ये (Bilaspur) पैशाच्या लोभातून आणि रागातून एका कलियुगी मुलाने अवघ्या दीड हजार रुपयांसाठी आपल्या वृद्ध आईची हत्या केली आहे. मुलाने आईला विटेने ठेचून मारले. अहवालानुसार, त्याने आपल्या आईकडे 1500 रुपये ठेवायला दिले होते, मात्र आईने त्या रुपयांचे घरातील किराणा सामान विकत आणले. याच रागातून मुलाने आईचा जीव घेतला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, काही तासांच्या शोधानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला पकडले.

हे प्रकरण बिलासपूर जिल्ह्यातील कोटा पोलीस स्टेशन परिसरातील पतैता ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. प्रेम यादव उर्फ ​​सलसलहा यादव असे आरोपी मुलाचे नाव आहे. कोटा पोलिस स्टेशनने सांगितले की, 29 मे रोजी पतैता ग्रामपंचायतीच्या कोरीपारा येथे एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासादरम्यान महिलेच्या मुलानेच आईची निर्घृण हत्या केल्याचे समजले. कुंतीबाई (60) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपी सलसलहा यादव आपल्या आईची हत्या करून जंगलात पळून गेला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जंगलाला वेढा घातला आणि 2 तास सतत शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांनी आरोपी मुलाला पतैता-कोरी जंगलातून अटक केली. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: प्रेयसीचे दुसरीकडे लग्न जमल्याने संतापलेल्या प्रियकराने अपहरण करून केला बलात्कार; गुन्हा दाखल)

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने आई कुंतीबाई यांच्याकडे 1500 रुपये मागितले होते. यावर आईने सांगितले की, रेशन खरेदीसाठी ते पैसे खर्च झाले. आईचे हे उत्तर ऐकून मुलगा संतापला आणि पैसे न दिल्याने त्याने आईच्या डोक्यात वीट मारण्यास सुरुवात केली. त्याला इतका राग आला होता की, त्याने विटेने ठेचून जन्मदात्या आईचा खून केला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केल्यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2024 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).