धक्कादायक! मध्य प्रदेशमध्ये कुत्रीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक

गौर चौकी परिसरातील रहिवासी अनुज तिवारी यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला व तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

विकृत मानसिकता आणि वासनेच्या आहारी गेल्याने लोकांच्या हातून अनेक दुष्कर्म घडल्याचे समोर आले आहे. सध्या जिथे स्त्रिया, किशोरवयीन मुली, महिला, वृद्ध महिला इतकेच काय तर मुलेही वासनेची शिकार बनत आहेत, तिथे आता जनावरेही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. याआधी प्राण्यांवर बलात्काराच्या (Animal Rape) घटना समोर आल्या आहेत आताही अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) येत आहे. इथे एका 54 वर्षीय व्यक्तीने आपली वासनेची भूक शांत  करण्यासाठी एका कुत्रीवर बलात्कार (Dog Rape) केला आहे. हे प्रकरण जबलपूरच्या गौर बरेलाचे आहे.

ग्रीन सिटीमधील एका विकृत व्यक्तीने, 11 जानेवारी रोजी रात्री उशिरा मादी कुत्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. गौर चौकी परिसरातील रहिवासी अनुज तिवारी यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला व तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी बलात्कार आणि प्राणी क्रौर्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. बरेला पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास केला आणि आरोपीला अटक करुन तुरूंगात टाकले.

पीपल फॉर अ‍ॅनिमलच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आयपीसी कलम 377 आणि पीसीए 11 (1) अंतर्गत बरेला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे विकृत कृत्य करणाऱ्या आरोपीचे एक चांगले कुटुंब आहे. त्याची मुलगी शिकवते आणि मुलगा नोकरी करतो. पत्नी एक शिक्षिका होती, परंतु तिला 10 वर्षांपासून तिला पक्षाघात आहे. आरोपी संगीत जैनचे हे कृत्य एकूण कुटुंबियांनाही लाज वाटली. (हेही वाचा: Pomeranian कुत्रीवर सामूहिक बलात्कार, तीन पुरुषांना अटक; Female Dog च्या अंगावर जखमा, प्रकृती गंभीर)

गौर चौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करुन न्यायालयात पाठविण्यात आले. सत्र न्यायालयातून जामीन अर्ज फेटाळून लावून त्याची रवानगी तुरुंगात केली. मानसशास्त्रज्ञांच्या मते मोबाइलने लोकांची मानसिकता इतक्या नीच पातळीवर आणली आहे, यामुळे लोक योग्य-अयोग्य मधील फरक विसरू लागले आहेत. या प्रकारानंतर पोलिसांना नोटीस बजावून, पुन्हा असा प्रकार घडलेला आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.