Cow Cabinet: गोधन संरक्षण व संवर्धनासाठी मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान सरकारची 'गो कॅबिनेट'ची घोषणा; गोपाष्टमीच्या मुहूर्तावर पहिली बैठक
तर 22 नोव्हेंबरला गोपाष्टमीच्या मुहूर्तावर त्याची पहिली बैठक होणार आहे.
मध्य प्रदेशामध्ये गायींच्या रक्षण आणि संवर्धनासाठी शिवराज चौहान (Shivraj Singh Chouhan) सरकारने एक मह्त्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आज मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्विटरवरून माहिती देताना राज्यात ' गो कॅबिनेट' (Cow Cabinet) स्थापन करणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये सहा विभागांचा समावेश असेल. पशुपालन, वन, पंचायत व ग्रामीण विकास, राजस्व, गृह आणि किसान कल्याण विभाग यांचा या गो कॅबिनेटमध्ये समावेश असेल. तर 22 नोव्हेंबरला गोपाष्टमीच्या मुहूर्तावर त्याची पहिली बैठक होणार आहे. ही बैठक गौ अभयारण्य, आगर मालवा येथे होणार आहे. अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
2014 साली केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार स्थापन करून भाजपाची सत्ता आल्यानंतर गोवंश हत्या बंदीचा कायदा अस्तित्त्वामध्ये आला होता. यानंतर आता काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश पोटनिवडणूकीमध्ये भाजपाला मिळालेल्या निवडणूकीमधील यशानंतर पक्षात चैतन्याचं वातावरण आहे. सध्या गायीच्या संरक्षणावरून देशभरात मागील काही महिन्यांत अनेकदा राजकाअरण तापल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकारचा नवा निर्णय चर्चेचा भाग बनला आहे. जबरदस्त! स्वतःच बैलगाडी खांद्यावर घेऊन शेतीचे काम करणाऱ्या एका बैलाचा व्हिडिओ झाला व्हायरल; नेटिझन्सही म्हणाले, आत्मनिर्भर!
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ट्वीट
दरम्यान देशामध्ये गौहत्या, गौ तस्करी सह गायींशी निगडीत अनेक गोष्टी, समस्या समोर येत होत्या. त्यावरून राजकारण देखील रंगत होते. अशामध्ये आता गो कॅबिनेटचा पर्याय त्या समस्या सोडवण्यास, गायींचं रक्षण करण्यास कितपत फायदेशीर ठरत आहेत हे येत्या काही काळात समजेल.