Shiladitya Chetia Suicide: Assam मध्ये पत्नीच्या मृत्यूचं दु:ख अनावर झाल्याने ICU मध्येच गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

राज्याचे गृह सचिव म्हणून नियुक्तीपूर्वी, शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे एसपी आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम पाहिले होते.

Shiladitya Chetia | X

आसाम (Assam) मध्ये एका IPS Officer ने स्वतःवर गोळ्या झाडून आयुष्य संपवल्याची करूण घटना समोर आली आहे. मृत अधिकारी हे गृहसचिव शिलादित्य चेतिया (Shiladitya Chetia)होते. पत्नीच्या मृत्यूचं दु:ख पचवू न शकल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान चेतिया यांच्या पत्नीचा कॅन्सर सोबत लढा सुरू होता. ती झुंज अपयशी ठरल्यानंतर पत्नीच्या निधनानंतर काही मिनिटांतच त्यांनी आत्महत्या केली. गृहसचिव शिलादित्य चेतिया, 2009 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी होते. खाजगी रूग्णालयात आसीयू मध्येच त्यांनी स्वतःच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून ही आत्महत्या केली आहे.

चेतिया यांची पत्नी ब्रेन ट्युमरनं त्रस्त होती. तिच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरू होते मात्र त्यामध्ये यश न आल्याने पत्नीचं निधन झालं त्याच आयसीयूमध्ये त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

राज्याचे गृह सचिव म्हणून नियुक्तीपूर्वी, शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे एसपी आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम पाहिले होते. शिलादित्य चेतिया यांच्या निधनाने संपूर्ण आसाम पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. आसाम पोलिसांचे डीजीपी जीपी सिंह यांनी देखील X वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif