Shikhar Dhawan: शिखर धवन पुन्हा पडला प्रेमात? मिस्ट्री गर्लसोबत दिसला एअरपोर्टवर

आता तो वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. आयशा मुखर्जीसोबत काडीमोडानंतर आता शिखर धवनच्या आयुष्यात नवी तरुणी आल्याची चर्चा रंगली आहे.

Photo Credit- X

Shikhar Dhawan: टीम इंडियाचा माडी ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे रील लोकांना फार आवडतात. मागच्या वर्षी शिखर धवन आणि आयशा मुखर्जी (Aesha Mukerji)यांच्यात काडीमोड झाला होता. तेव्हापासून शिखर धवन एकटा आहे. मध्यंतरीच्या काळात मुलाची भेट होत नसल्याची भावूक पोस्टही त्याने टाकली होती. असं असताना एका व्हिडीओमुळे सोशल मिडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. शिखर धवनला मिस्ट्री गर्लसोबत एअरपोर्टवर स्पॉट (Shikhar Dhawan spotted with mystery woman)केलं गेलं आहे. त्यामुळे ही मुलगी कोण आहे? दोघांत प्रेम रंगतय का? दुसरं लग्न करणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घटस्फोट झाला. त्यामुळे शिखर धवन नव्या तरुणीसोबत दिसणं खूप काही सांगून जातं. व्हिडीओमध्ये शिखर धवन ब्लू टीशर्ट आणि ब्लॅक कार्गो घातली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या तरूणीने काळ्या रंगाची पॅन्ट आणि पिच कलरचा

टॉप घातला आहे. विशेष म्हणजे तरुणी स्वत: कॅमेऱ्यात चित्रित होणार नाही याची काळजी घेत होती. शिखर धवनही तिच्यासोबत फोटो किंवा व्हिडीओ येणार नाही याची काळजी घेत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

शिखर धवनने या वर्षीच ऑगस्टमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 269 सामने खेळले आहेत. यात 24 शतकं आणि 44 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 10867 धावा केल्या आहेत. भारतासाठी वनडे वर्ल्डकप 2015 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.