अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांचे महत्त्वपूर्ण ट्विट, 'अजित पवार दिशाभूल करत आहेत'
त्यांचे विधान संभ्रम निर्माण करणारे आहे. ज्यामुळे जनतेमध्ये चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील' असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट केले आणि राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. अजित पवार यांच्या ट्विटनंतर रष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मग ट्विट करुन अजित पवार यांच्या भूमकेचे खंडण केले. ''भाजपासोबत जाण्याचा कोणताही प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असे तिघे मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे'', असं ट्विटद्वारे शरद पवार यांनी सांगितले आहे.
अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भूमिकेचे नेमक्या शब्दांत खंडण करताना शरद पवार यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांचे म्हणने साफ खोटे असून, ते दिशाभूल करत आहेत. त्यांचे विधान संभ्रम निर्माण करणारे आहे. ज्यामुळे जनतेमध्ये चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
शरद पवार ट्विट
अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भूमिकेचे नेमक्या शब्दांत खंडण करताना शरद पवार यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांचे म्हणने साफ खोटे असून, ते दिशाभूल करत आहेत. त्यांचे विधान संभ्रम निर्माण करणारे आहे. ज्यामुळे जनतेमध्ये चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. (हेही वाचा, मी राष्ट्रवादी पक्षातच, शरद पवार हेच आपले नेते; अजित पवार यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क)
अजित पवार ट्विट
दरम्यान, अजित पवार यांचे बंड शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोडून काढले आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या अजित पवार यांनी आमदार आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठीच असे विधान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून काही काळ संयम बाळगा असे अवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक प्रकारे ट्विटयुद्ध रंगल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. असे काही घडेल अशी कल्पनाही राज्याच्या राजकारणात कधी बोलून दाखवली नव्हती. त्यामुळे असे घडलेच कसे अशी चर्चाही राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.