Sharad Pawar on JPC Demand In Hindenburg Report: अदानी प्रकरणावर शरद पवारांची अन्य 19 विरोधी पक्षांपेक्षा वेगळी भूमिका; जाणून घ्या काय म्हणाले
हिंडेनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. त्यांच्याबाबत पूर्वी ऐकलेलं नाही. त्यांच्या अहवालापेक्षा देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडे अधिक विश्वासाने पाहत असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenburg Report) वरून गौतम अदाणी यांच्या विरोधात कॉंग्रेस सह देशातील विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत. अदानी प्रकरणावरून कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेला आता एनसीपीकडूनच छेद देण्यात आला आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावर जेपीसी ऐवजी देशातील सर्वोच्च न्यायसंस्था सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या अहवाल अधिक प्रभावी राहील अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.
शरद पवारांनी जेपीसीच्या मागणीवर आपली भूमिका मांडताना राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांनी मिळून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बनते त्यामुळे सहाजिकच सत्ताधारी पक्षाचे अधिक जण या समितीमध्ये असतील त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये त्यामधून किती सत्य बाहेर येईल? यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 19 विरोधी पक्षाचे बहुमत असेल पण ते पक्ष जेपीसी मध्ये नसतील. जेपीसी मध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल त्यामुळे सुप्रीम कोर्ट चौकशी महत्वाची आहे. असे शरद पवारांचे मत आहे. दरम्यान हिंडेनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. त्यांच्याबाबत पूर्वी ऐकलेलं नाही. त्यांच्या अहवालापेक्षा आपल्या देशातील संस्था काय बोलते याकडे अधिक लक्ष दिले जाईल असं पवार म्हणाले आहे. तर अदानींना टार्गेट केलं जात असल्याची भावना देखील यावेळी शरद पवारांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी राहुल गांधी यांच्यावर भाष्य करणं टाळलं आहे. पण अदानी प्रकरणापेक्षा अनेक महत्त्वाचे मुद्दे राज्यात देशात आहे. असं देखील म्हटलं आहे. नक्की वाचा: Gautam Adani यांचे ग्रह फिरले; अदानी समूहाच्या तीन कंपन्या ASM यादीत, S&P Dow Jones कडूनही समभाग वगळण्याची घोषणा.
पहा काय म्हणाले शरद पवार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित संबंधांवरून टीकेची झोड उठवली आहे. पण आता त्यावर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आम्ही राजकारणात आलो, त्या वेळी सरकारवर टीका करण्यासाठी टाटा-बिर्लांवर टीका केली जात असे. त्यानंतर समजले, की टाटांचे या देशात किती योगदान आहे. आज टाटा-बिर्लांऐवजी अदानी-अंबानीवर हल्ला केला जात आहे.असेही पवार म्हणाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)