कर्नाटक: सात डोक्यांच्या सापाची कात पाहण्यासाठी मंदिर परिसराजवळ भाविकांची गर्दी (Watch Video)
मात्र सर्प मित्रांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे.
कर्नाटक येथील एका गावामध्ये सात डोक्यांच्या सापाची कात पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सापाची ही कात कनकपूरा (Kanakapura) गावात एका मंदिराच्या परिसरात असल्याने भाविकांमध्ये हा प्रकाराबद्दल अधिक उत्सुकता होती. हळूहळू सोशल मीडिया आणि टीव्हीवर याबाबतची माहिती पसरल्यानंतर पुराणातील सात डोक्याच्या सापाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.
प्रशांत नामक एका स्थानिकाने TOI ला दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारची सापाची कात सापडली होती. गावकर्यांनी सापाची कात सापडलेल्या जागी मंदिराची उभारणी केली. ती जागा धार्मिकदृष्ट्या खास असेल असं म्हणत तेथे मंदिराची उभारणी झाली आहे. मात्र आता सापडलेली सापाची कात हा परिसर मंदिराजवळच आहे. बुधवार (9 ऑक्टोबर) सकाळी मंदिर प्रशासनाच्या कार्यकर्त्यांना साफसफाई करताना सापाची कात आढळली आहे. बालाप्पा या गावकर्याच्या जमिनीवर ही कात सापडली आहे. असेही प्रशांत म्हणाला आहे. #Video: कल्याण मध्ये भर रस्त्यात आढळला दोन तोंडाचा घोणस साप
कनकपूरा मध्ये आढळेली सापाची कात
सर्पमित्रांनी मात्र बहु डोक्यांचा सापाच्या अस्तित्त्वाच्या शक्यता फेटाळल्या आहेत. दोन डोक्यांचा साप असू शकतो मात्र त्याची शक्यतादेखील फार विरळ आहे. माणसांमध्ये जसे क्वचित दोन डोक्यांची जुळी मुलं जन्म घेतात. त्याप्रमाणेच हा प्रकार सापांमध्ये आढळून येऊ शकतो. असं मत रामू पी यांनी टाईम्स सोबत बोलताना म्हटलं आहे.