Sedition Charge On MP Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, 'सामना'तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'रोखठोक' लिखाण कारणीभूत
यवतमाळ पोलिसांनी (Yavatmal Police) ही कारवाई केली आहे.
शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सामना' (Saamana) दैनिकाचे संपादक खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर 'देशद्रोह' (Sedition Charge) आणि इतर आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यवतमाळ पोलिसांनी (Yavatmal Police) ही कारवाई केली आहे. सामना दैनिकातून 'रोखठोक' (Rokthok) या सदरात राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या टीकात्मक लिखानावरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153 (A), 505 (B) आणि 124 (A) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
अमित शाह यांच्यावर गुन्हा दाखल होणार का?
'रोखठोक' सदरातील 'भाजप खरंच जिंकला काय?' या लेखातील लिखानावरुन प्रसारमाध्यमांनी विचारले असता, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. जर गुन्ह्याबद्दलच बोलायचे तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल काढलेले अनुद्गार आणि केलेली टीका यांवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल काय? देशात लोकशाही आहे. राजकारणात टीकाटीपण्णी होतच असते. लोक टीका करतात. ती सहन करायची असते. राजकीय लोक नेहमीच वक्तव्ये करत असतात. पण असे असताना जर बोलणाऱ्या, टीका करणाऱ्या लोकांवर टीका होत असेल तर या मंडळींना आम्ही आणीबाणी विरोधात लढलो हे सांगण्याचा अधिकार नाही. (हेही वाचा, Khichdi Scam: संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा वाढणार; खिचडी घोटाळ्या प्रकरणी EOW ने भाऊ संदीप राऊत यांचा जबाब नोंदवला)
एक्स पोस्ट
हेच ते 'रोखठोक' मधील कथीत वादग्रस्त लिखाण
संजय राऊत यांनी प्रदीर्घ लेख लिहीला आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र, कळीचा मुद्दा ठरला आहे ते या लेखातील सर्वात शेवटचा परिच्छेत. ज्यामुळेच राऊतांवर थेट 'देशद्रोहा'चा गुन्हा दाखल झाला आहे. तो परिच्छेद पुढीलप्रमाणे- ‘इंडिया’ आघाडीस मरगळ झटकून पुढचे दमदार पाऊल टाकायला लावणारे हे निकाल आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसने जिंकले असते तर 2024 च्या निवडणुकीआधी मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बाम्ब टाकला असता. एखादे नवे ‘पुलवामा’ घडताना उघडय़ा डोळय़ाने पाहिले असते. कश्मीरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात व ’देश खतरे में’च्या गर्जना करून ‘देशभक्ती’साठी मते मागितली असती. जवानांच्या शवपेटय़ांना वंदन करण्याची छायाचित्रे फिरवून आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणी नाही हे ठसवण्याचा प्रयत्न झाला असता. प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतात त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीआधी दंगली व मोठय़ा नरसंहाराचा बेत तडीस नेला असता. आशा आहे, तीन राज्यांतील विजयांमुळे हे बेत तूर्त रहीत केले जातील! पण तीन राज्यांमधील विजय म्हणजे 2024 च्या विजयाचा शंखनाद या भ्रमात जे आहेत त्यांनी त्याच भ्रमात राहणे देशहिताचे आहे!