Secure Digital Economy a Global Challenge: डिजिटल अर्थव्यवस्थेतील सुरक्षा हे जागतिक आव्हान, त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज- Minister Rajeev Chandrasekhar

चंद्रशेखर म्हणाले, या कंपन्यांवर डेटाचे उल्लंघन, सायबर खंडणी यांसाठी होणारे हल्ले तसेच सेवा रोखण्यासाठी होणारे सायबर हल्ले हे सरकार तसेच सामान्य जनतेला धोका निर्माण करतात.

Rajeev Chandrasekhar (Photo Credit: Twitter/IANS)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Minister Rajeev Chandrasekhar) यांनी सोमवारी सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेतील सुरक्षिततेचा (Security in Digital Economy) प्रश्न हे जागतिक आव्हान आहे आणि ते हाताळण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. ग्लोबल पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) परिषदेला संबोधित करताना चंद्रशेखर म्हणाले की, डिजिटल अर्थव्यवस्थेची सुरक्षा ही देशांतर्गत समस्या नाही आणि त्यावर फक्त निवडक सहकार्यातून काम करता येणार नाही.

‘डिजिटल अर्थव्यवस्थेत सुरक्षेच्या देशांतर्गत, कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक पैलूंमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग विकसित करण्यासाठी सामायिक समज विकसित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आरोग्य-तंत्रज्ञान, आर्थिक-तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेटवर आधारित कंपन्यांकडे आता ग्राहकांबद्दल बरीच संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती आहे. अशात फिन्टेकमध्ये सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक संख्या आहे, त्यानंतर आरोग्य सेवा आणि सोशल मीडियामध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे घडत आहेत.

चंद्रशेखर म्हणाले, या कंपन्यांवर डेटाचे उल्लंघन, सायबर खंडणी यांसाठी होणारे हल्ले तसेच सेवा रोखण्यासाठी होणारे सायबर हल्ले हे सरकार तसेच सामान्य जनतेला धोका निर्माण करतात. अशा गुन्ह्यांमुळे ग्राहकांचा विश्वास गमावल्याने शेवटी डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक वाढीवर परिणाम होईल. (हेही वाचा: डिजिटल पेमेंटमध्ये भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर; 2022 मध्ये 89.5 दशलक्ष व्यवहारांची नोंद)

दरम्यान, आज ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, सरकारने पहिल्यांदाच ऑनलाइन गेमिंगसंदर्भात एक फ्रेमवर्क तयार केला आहे, ज्यामध्ये देशात 3 प्रकारच्या गेमला परवानगी देण्यात येणार नाही. सट्टेबाजीचा समावेश असलेल्या किंवा वापरकर्त्यासाठी हानीकारक ठरणाऱ्या आणि व्यसनाधीन घटकांचा समावेश असलेल्या खेळांवर देशात बंदी घातली जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif