SBI ची नवी योजना! बिल्डरने वेळेवर घराचा ताबा न दिल्यास बँक परत करणार Home Loan चे पैसे

मात्र रिअल इस्टेटमधील परिस्थिती ठीक करण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय यांनी एक नवी योजना सुरु केली आहे. त्यानुसार निर्धारित कालावधीत घराचा ताबा न मिळाल्यास बँक ग्राहकांना त्यांचे होमलोनचे पूर्ण पैसे परत करणार आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

देशात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. मात्र रिअल इस्टेटमधील परिस्थिती ठीक करण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय यांनी एक नवी योजना सुरु केली आहे. त्यानुसार निर्धारित कालावधीत घराचा ताबा न मिळाल्यास बँक ग्राहकांना त्यांचे होमलोनचे पूर्ण पैसे परत करणार आहे. ही रिफंड योजना ज्यावेळी बिल्डरला ओसी सर्टिफिकेट मिळत नाही तो पर्यंत मान्य असणार आहे.

रेशिडेंशल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी स्कीम नावाच्या अंतर्गत 2.5 करोड रुपयांचे घराची किंमत असल्यास त्यांना होम लोन मिळणार आहे. यामध्ये मात्र बँकेच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये बिल्डरला 50 करोड ते 400 करोड रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. एसबीआयचे प्रमुख रजनीश कुमार यांनी असे सांगितले आहे की, नव्या योजनेचा परिणाम रिअल इस्टेट आणि घर खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. कारण काहीवेळस घराचा ताबा मिळाल्यानंतर अडथळे येतात. RERA आणि GST नियमात बदल किंवा नोटाबंदी नंतर व्यक्ती घर खरेदी आणि त्यांचे अधिक पैसे खर्चिक होऊ नये म्हणून हा मार्ग शोधून काढण्यात आल्याचे रजनीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. ही योजना प्रथम मुंबईतील सनटेक डेव्हलपर्ससोबत तीन प्रोजेक्टसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.(HDFC ग्राहकांसाठी खुशखबर, गृहकर्ज झाले स्वस्त)

कशा पद्धतीने ही योजना काम करणार?

रजनीश कुमार यांनी या योजनेची अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, जर घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीने 2 करोड रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी 1 करोड रुपये भरले आहेत. मात्र पुढे जाऊन घराचा प्रोजेक्ट काही कारणास्तव बंद पडल्यास बँक त्यांना 1 करोड रुपये रिफंड म्हणून देणार आहे. मात्र हा नियम ओसी संबंधित लागू असणार आहे.