IPL Auction 2025 Live

परदेशात शिक्षण घेणे होणार सोप्पे, SBI विद्यार्थ्यांना देतेय 1.5 कोटी रुपयांचे कर्ज

कारण एसबीआयकडून तुम्हाला परेशात शिकरण्यासाठी 7.30 लाख ते 1.50 कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते.

State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

जर तुम्ही परदेशात शिकण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण एसबीआय (SBI) कडून तुम्हाला परेशात शिकरण्यासाठी 7.30 लाख ते 1.50 कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते. एसबीआयने शिक्षण कर्ज ही नवी सुविधा लॉन्च केली आहे. त्याअंतर्गत तुम्हाला परदेशात शिकण्याच्या संधीचा फायदा घेता येणार आहे. बँकेने या कर्जाचे नाव SBI Golbal ED-Vantage असे ठेवले आहे.(BCCI Vacancy 2021: नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांकरीता निघाली भरती)

या कर्जाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासह शिक्षण घेण्याची सुविधा मिळणार आहे. एसबीआयने म्हटले की, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना लॉन्च केली आहे. ही योजना रेग्युलर ग्रॅज्युएट डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, डिप्लोमा कोर्स आणि सर्टिफिकेट किंवा डॉक्टरेट कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या कर्जाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला अमेरिका, युके, युरोप, जापान, सिंगापूर, हाँगकॉंग, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्युझीलंड मध्ये शिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे.

एसबीआयच्या या शिक्षण कर्जाचे दर 8.64 टक्के ठेवण्यात आले आहे. मुलींना या कर्जात 0.50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. म्हणजेच महिला विद्यार्थ्यांना कर्जाचा दर हा 8.15 टक्के असणार आहे. कर्जामध्ये प्रवासाचा खर्च, ट्युशन फी सुद्धा यामध्ये जोडली जाणार आहे. लायब्रेरी आणि लॅबचा खर्च, परिक्षेची फी, पुस्तकांव्यतिरिक्त प्रोजेक्ट वर्क, थीसिस, स्टडी टूर याचा सुद्धा या कर्जामध्ये समावेश केला जाणार आहे.(CBSE Private, Compartment Exams 2021 Admit Cards Released: 25 ऑगस्ट पासून सुरू होणार्‍या परीक्षांसाठी cbse.nic.in वरून अशी डाऊनलोड करा अ‍ॅडमीट कार्ड्स)

या कर्जासाठी 10 वी, 12 वी आणि ग्रॅज्युएशनचे सर्टफिकेट आणि एन्ट्रन्स परिक्षेचा निकाल असावा. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रवेश घेतल्याच्या आधारावर प्रवेशाचे लेटर किंवा कॉलेजचे ऑफर लेटर बँकेला द्यावे लागणार आहे. तसेच कोर्समध्ये तुम्हाला अॅडमिशनच्या खर्चाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असणार आहे. स्कॉलरशिप, फ्री-शिपची कॉपी सुद्धा तुमच्याकडे असावी. जर तुमच्या शिक्षणात गॅप असेल तर तुमच्याकडे पासपोर्ट साइज फोटो, विद्यार्थ्यासह पालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड कॉरी आणि पालकांचे गेल्या 6 महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट असावे. तुम्ही कर्जाचे पैसे हे 6 महिन्यानंतर देऊ शकता. परदेशात शिक्षणासाठी गेलेला कोणताही विद्यार्थी हा 15 वर्षात कर्जाचे पैसे परत करु शकतो.